जुनाई नदीच्या रुंदीकरणास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

या कामात नदीच्या रुंदी व खोलीकरणासाठी जलसंपदा विभागाने पोकलॅंड मशिन उपलब्ध करून दिले आहे. या कामामुळे नदीचे पुनरुज्जीवन होऊन परिसरातील पाणीपातळी वाढेल

निमोण - जलयुक्त शिवार योजनेंतर्गत येथील जुनाई नदीच्या खोली व रुंदीकरणाचा प्रारंभ निमोण येथील ज्येष्ठ नागरिक नामदेव सोनवणे यांच्या हस्ते झाला.

आमदार डॉ. राहुल आहेर, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तालुका कृषी अधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सिमेंट बंधारे, सलग समतल चर, कंपार्टमेंट बांध, गाळ काढणे आदी लाखो रुपयांची कामे सुरू आहेत. या कामात नदीच्या रुंदी व खोलीकरणासाठी जलसंपदा विभागाने पोकलॅंड मशिन उपलब्ध करून दिले आहे. या कामामुळे नदीचे पुनरुज्जीवन होऊन परिसरातील पाणीपातळी वाढेल. या वेळी मंडल कृषी अधिकारी पाखरे, कृषी सहाय्यक संदीप वाघ, ग्रामसेवक सी. टी. ठाकरे, पोलिसपाटील हिरामण देवरे, डॉ. भाऊराव देवरे, सहकारी संस्थेचे संचालक चंद्रभान उगले, अरुण थोरमिसे, सुधीर देवरे, उत्तम देवरे, विजय सोनवणे व आनंदा देवरे आदी उपस्थित होते.