आरटीओ एजंटने चोरल्या महागड्या मोटारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

जळगाव - पुणे- मुंबईतून भाड्याने मोटारी घेऊन जळगाव- जामनेर रस्त्यावर घेऊन जात चालकाला उतरवून वाहन पळविणाऱ्या सय्यद शकील सय्यद युसूफ (वय 37) या भामट्याला अटक केली आहे. राज्यातून पंधरा ते वीस महागड्या मोटारी चोरून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाच मोटार लांबविल्याची कबुली दिली आहे. पिंपरी- चिंचवड (पुणे) पोलिसांनी मोटार चोरीच्या गुन्ह्यात सय्यद शकील सय्यद युसूफ याला अटक केली होती. औद्योगिक वसाहत पोलिस पथकाने गुन्हा वर्ग करीत संशयिताला जळगावात आणले. सय्यद शकील सय्यद युसूफ (वय 37) हा बुलडाणा येथील आरटीओ कार्यालयात पूर्वी एजंट म्हणून काम करीत होता.