'नाताळ'ला रंग, रेषा, सूर, कविता, अभिनयाचा साज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नाशिक : नाताळची रम्य सकाळ... येशू ख्रिस्ताचा आकर्षक सजावटीने साकारलेला जन्माचा देखावा... चर्चमधील प्रार्थना... तसेच नाताळच्या शुभेच्छांची देवाणघेवाण... अशा प्रसन्न वातावरणात ठिकठिकाणी बसलेल्या चित्रकारांकडून कॅनव्हॉसवर झालेली रंगांची उधळण... 
चित्रकलेच्या जोडीला 'ईस्ट ऍण्ड वेस्ट म्युझिक इन्स्टिट्यूट'तर्फे गिटारवर सादर झालेले 'जिंगल बेल, जिंगल बेल', 'वुई अडोअर यू' या गाण्यांवर तरूणाईने धरलेला ठेका... लावण्या कोचर या चिमुकलीने सादर केलेले 'सेंतोरोनी पीस', तसेच कविता आणि नाटकातील स्वगताच्या सादरीकरणाने होलिक्रॉस चर्चमधे 'सकाळ कलांगण' उपक्रम बहरला. 

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'सकाळ कलांगण' हा कलेच्या प्रसारासाठी राबविला जाणारा उपक्रम नाताळनिमित्त होलीक्रॉस चर्चमध्ये झाला. यावेळी चित्रकारांनी सांताक्‍लॉज, येशू जन्माचा देखावा, चर्च तसेच चर्चमधील वातावरण अशा नाताळच्या वातावरणाची सुंदर चित्रे रेखाटली. 
होलीक्रॉसचे प्रमुख धर्मगुरू फादर वेन्सी डिमेलो, 'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, फ्रान्सिस वाघमारे, ईस्ट ऍण्ड वेस्ट म्युझिक इन्स्टिट्यूटचे नरेंद्र पुली, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्यासह शहरातील चित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फादर डिमेलो यांनी सांगितले, की चर्चमध्ये सादर झालेल्या कलाविष्काराने खऱ्या अर्थाने नाताळचा आनंद दिला आहे. साहित्य, शास्त्र, कला, क्रिडा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसामाणसात पूल बांधले जाऊन एकोपा घडण्यासाठी मदत होते. 'गुलाबाच्या फुलांनो सांगा रे मला, एवढा सुंदर रंग तुला कुणी रे दिला' गाणे सादर करत कलांगणमध्ये रंग भरला.