‘राधा तेरी चुनरी..’अन्‌ रिमिक्‍स डान्सचा धमाका!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

जळगाव - ः दे बाई दे जोगवा दे..., छम छम..., हम्मा हम्मा..., राधा तेरी चुनरी...यासारख्या हिंदी गीतांसोबत रिमिक्‍सचा धमाका करत चिमुकल्या पावलांनी उत्सवात आज रंग भरला. रात्रीच्या थंडगार वाऱ्यातील बोचऱ्या थंडीतही ‘सकाळ- एनआयई’तर्फे आयोजित ‘महा-डान्स धमाका’ कार्यक्रमात उर्जा निर्माण केली.

जळगाव - ः दे बाई दे जोगवा दे..., छम छम..., हम्मा हम्मा..., राधा तेरी चुनरी...यासारख्या हिंदी गीतांसोबत रिमिक्‍सचा धमाका करत चिमुकल्या पावलांनी उत्सवात आज रंग भरला. रात्रीच्या थंडगार वाऱ्यातील बोचऱ्या थंडीतही ‘सकाळ- एनआयई’तर्फे आयोजित ‘महा-डान्स धमाका’ कार्यक्रमात उर्जा निर्माण केली.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे शिवतीर्थ मैदानावर ११ ते १६ दरम्यान ‘महा-एक्‍स्पो-२०१७’अंतर्गत ‘एनआयई’ व्यासपीठातर्फे दोन दिवस ‘महा-डान्स धमाका’ नृत्यस्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी ३३ स्पर्धकांनी नृत्य सादर केले. ‘दे बाई दे जोगवा दे...’ या भक्‍तीगीतावर प्राची वर्मा हिने सादर केलेल्या सोलो डान्सने आजच्या स्पर्धेला सुरवात झाली. त्यानंतर हिंदी- मराठीसह रिमिक्‍स गाण्यांवर सोलो, ड्युएट, ग्रुप डान्सचा आविष्कार चिमुकल्यांनी दाखविला. स्पर्धेतील सर्व सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र व श्रीराम ग्रुपतर्फे भेटवस्तू देण्यात आली. स्पर्धेत परीक्षक म्हणून मनोज रंधे व श्रद्धा पवार यांनी काम पाहिले.

बहारदार नृत्यांचा ठेका
महाडान्स धमाका आज खऱ्या अर्थाने रंगला. चिमुकल्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याच्या ठेक्‍याने स्पर्धा चांगलीच बहरली होती. शॉपिंगच्या निमित्ताने आलेल्या नागरीकांनी चिमुकल्यांच्या बहारदार नृत्याचा आनंद घेतला. यात खुशबू खडकेचा राधा तेरी चुनरी..., श्रावणी वाघच्या हम्मा हम्मा..., तसेच तन्वी ॲण्ड सुकदेवच्या तु जो मिला..., मोहिनी महालेच्या रिमिक्‍स गीतावरील डान्सने उपस्थितांची दाद मिळविली. तर मोक्षदा ॲण्ड ग्रृपच्या काला चष्मा...दिनेश तायडेच्या अभी तो पार्टी शुरू हुई है...या गीतांवरील नृत्यांनी धम्माल उडविली.

रविवारी बक्षीस वितरण
‘महा- डान्स धमाका’ ही तीन गटांत घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी (१५ जानेवारी) सायंकाळी करण्यात येणार आहे. तिन्ही गटांतील विजेत्या स्पर्धकांना फोनवरून संपर्क साधून याबाबत कळविण्यात येणार आहे. तर फूड फेस्टिव्हलमध्ये उद्यापासून (१३ जानेवारी) पुढील तीन दिवस सायंकाळी साडेसहापासून बहारदार गीतांचा कार्यक्रम होईल.

यांनी उडविली धम्माल
आजच्या महाडान्स धमाका स्पर्धेत मोहिनी जाधव, प्राची वर्मा, तन्वी वाघ, कोमल आणि कृष्णा, विराज आणि संजना, रूद्राक्षी भावे, सुहानी बारी, मेघना विसपुते, प्रथमेश ॲण्ड ग्रुप, आर्या पवार, यामिनी महाले, मोक्षदा छाजेड, खुशबू खडके, प्राची ॲण्ड ग्रृप, अंकुश ॲण्ड दिशा, श्रावणी वाघ, तन्वी ॲण्ड सुकदेव, कृपल अडावदकर, मोहिनी महाले, प्रथमेश ठाकूर, मनन छाजेड, दिनेश तायडे, नान्सी मगरानी, सौम्या, टेरेफिक डान्स अकॅडमी, माहि ॲण्ड ग्रुप, फाल्गुणी ॲण्ड दिशा, पॅसिफीक लिटील मास्टर ग्रुप, लाभेश ॲण्ड कुश, हिमांशु पाटील, पांडूरंग, यांचा नृत्यविष्कार झाला.

Web Title: sakal -nie- mahadance