'समृद्धी'साठी दडपशाहीने जमिनी घेता येणार नाहीत - जितेंद्र आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पांढुर्ली - प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांवर जो दबाव टाकला जात आहे, तो योग्य नाही. कुणालाही दडपशाहीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेता येणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज शिवडे (ता. सिन्नर) येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत दिला. 

समृद्धी महामार्गाच्या जमिनीची मोजणी करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवडेच्या शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करून पळवून लावले होते. जीव गेला तरी बेहत्तर; पण आमची एक इंचही जमीन समृद्धी महामार्गाला देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. एक आठवड्यापासून प्रकल्पबाधित शेतकरी आपल्या मुला-बाळांना घेऊन आंदोलन करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार आव्हाड यांनी शिवडे गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासाठी निवडलेल्या जागेची बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली.