सटाणा महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक संस्कारपीठ: राघोनाना अहिरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

सटाणा - प्रयत्नांना जिद्द व चिकाटीची जोड दिल्यास जीवनात कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. मविप्र समाज संस्थेच्या सटाणा महाविद्यालयाने शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करीत संपूर्ण राज्यात एक लौकिक प्राप्त केला असून, हे महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक संस्कारपीठ ठरले आहे, असे प्रतिपादन मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे यांनी आज येथे केले.

सटाणा - प्रयत्नांना जिद्द व चिकाटीची जोड दिल्यास जीवनात कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. मविप्र समाज संस्थेच्या सटाणा महाविद्यालयाने शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करीत संपूर्ण राज्यात एक लौकिक प्राप्त केला असून, हे महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक संस्कारपीठ ठरले आहे, असे प्रतिपादन मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे यांनी आज येथे केले.

येथील मविप्र संचलित कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज बुधवार (ता.१३) रोजी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात उपसभापती श्री. अहिरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य व साहित्यायन संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. महाविद्यालयीन जीवनामध्ये लागलेली शिस्त विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या जडणघडणीमध्ये खूप उपयोगी पडत असल्याचेही श्री.अहिरे यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.धोंडगे यांनी विविध स्पर्धा परीक्षांसोबतच राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी यश मिळवावे यासाठी महाविद्यालयाकडून विशेष मार्गदर्शन केले जात असून विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ८१.१० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५१ टक्के लागला असून ऋतुजा पाटील (८४.९२) प्रथम, रश्मी अमृतकर (८०.७६) द्वितीय, नूतन सोनवणे (७९.६९) तृतीय, जयश्री अहिरे (७९.३८) चतुर्थ, मृणाल पवार (७८.७६) पाचवा क्रमांक मिळविला. कला शाखेचा निकाल ४१.२५ टक्के लागला असून नितीन चौरे (७८.४६), भावेश कदम (७१.८५) द्वितीय, मोनिका केदारे (६७.८५) तृतीय, भास्कर चौरे (६३.५४) चतुर्थ, शुभम दातरे व दीपिका बोरसे (६३.२३) पाचवा क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेचा निकाल ८७.८४ टक्के लागला असून उमा जैन (९०.९२) प्रथम, दिनेश कटारे (८५.०७) द्वितीय, गायत्री खैरनार (८४.७६) तृतीय, हर्षद मंडलिक (८१.६९) चतुर्थ, धीरज केल्हे (८०.७६) पाचवा क्रमांक मिळविला. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल ६४.१५ टक्के लागला असून पूजा पगार (७३.५४) प्रथम, वैभव अहिरे (७३.०८) द्वितीय, तृप्ती खैरनार (७२.४६) तृतीय, संदीप जाधव (७०.४६) चतुर्थ, नितीन निकम व साक्षी पवार (७०.४६) पाचवा क्रमांक मिळविला. 

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उपसभापती श्री. अहिरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. ए. आर. निकम, प्रा. अशोक पाटील, प्रा. प्रफुल्ल ठाकरे, प्रा. प्रकाश पवार, प्रा. दिनेश वाघ, प्रा. अमोल देवरे, प्रा. कल्पना रेपाळ, प्रा. जी. आय. परदेशी, प्रा. आकांशा ठाकरे, प्रा. एफ. वाय. भोये, प्रा. एल. पी. गवळी, मनोज पाटील आदी प्राध्यापक व पालक उपस्थित होते. प्रा. सुनील बागुल यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title: Satana College is the sanskarpeeth for students : Raghonaa Ahire