श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा व यात्रोत्सवास प्रारंभ

श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा व यात्रोत्सवास प्रारंभ

सटाणा - उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३० व्या पुण्यतिथी सोहळा व यात्रोत्सवास आजपासून उत्साहात सुरुवात झाली. पहाटे चारला बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व सौ.स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड व सौ.अरुणा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे व सौ.योगिता मोरे, देवस्थानचे विश्वस्त धर्मा सोनवणे व सौ.कमळाबाई सोनवणे यांच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली.

आज पहाटे तीनपासूनच आरमतीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारुडे, भजने आदी मंगलमय कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणाऱ्या शहनाई व सनई चौघड्यामुळे यामुळे शहरातील वातावरण भल्या पहाटे भक्तीमय झाले होते. पहाटे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थानचे विश्वस्त धर्मा सोनवणे यांच्या सपत्नीक हस्ते महापूजेस सुरुवात झाली. महापूजेसाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. महापूजेचे पौरोहित्य राजेंद्र कुलकर्णी, परिमल जोशी, मकरंद पाठक, संजय चंद्रात्रे प्रा.धनंजय पंडित, संजय चंद्रात्रे, पियुष गोसावी, आबा मुळे, पंकज इनामदार, बाळा पाठक, विनायक कुलकर्णी, रोहित देशपांडे, बबन मुळे, भास्कर जोशी, गजानन जोशी, अभय चंद्रात्रे, कौस्तुभ पिसोळकर, ऋषी चंद्रात्रे आदींनी केले. शरद गुरव आणि पप्पू गुरव यांनी सनई चौघड्याचे वादन केले. 

यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, विश्वस्त व बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे, एड. विजयबापू पाटील, राजेंद्र भांगडिया, रमेश सोनवणे, बाबुराव सोनवणे, कौतिक सोनवणे, हेमंत सोनवणे, स्वप्नील बागड, नगरसेवक महेश देवरे, संजय खैरनार, शिवा सैंदाणे, भगवान सैंदाणे, अभिजित बागड, दत्तू बैताडे, वैभव गांगुर्डे, रोशन सोनवणे, सी.डी.सोनवणे, भगवान सोनवणे, ललित सोनवणे, देविदास भावसार, शेखलाल मन्सुरी, निलेश अमृतकर, योगेश अमृतकर, बापू अमृतकर, बा.जि.पगार, यशवंत सोनवणे, देवेंद्र वाघ, पोलीस हवालदार पुंडलिक डंबाळे, पोपटराव गोसावी, नाना मोरकर, बाबूलाल मोरे आदींसह भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. 

महाआरतीनंतर महाराजांच्या दर्शनसाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महापुजेनिमित्त श्री यशवंतराव महाराज मित्र मंडळातर्फे दिवसभरात मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ६०० किलोंची साबुदाणा खिचडी महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. 

दरम्यान, येथील बागलाण तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीची पूजा आज सकाळी प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व सौ.स्नेहा धिवरे यांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या देवमामलेदारांच्या मंदिरात पहाटे चार वाजता सालाबादाप्रमाणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, भारती कदम, राजेश भोपळे, श्रद्धा भोपळे, पोलीस नाईक देवराम खांडवी व नंदा खांडवी यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. तुषार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. दुपारी तीन वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे व पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या सपत्नीक हस्ते महाराजांच्या रथमिरवणुकीस सुरुवात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com