तरुण व्यावसायिकाची तणावातून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

सातपूर - गंगापूर रोडवरील पेट्रोल पंपचालक व तरुण व्यावसायिक राकेश अशोक कहाणे (वय 38) यांनी शनिवारी रात्री राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.

सातपूर - गंगापूर रोडवरील पेट्रोल पंपचालक व तरुण व्यावसायिक राकेश अशोक कहाणे (वय 38) यांनी शनिवारी रात्री राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.

राकेश शनिवारी रात्री दैनंदिन कामे आटोपून गंगापूर रोडवरील सहदेवनगरमधील यश या बंगल्यात आले. रात्री उशिरा त्यांनी विष प्यायले. घरच्यांनी राकेश अजून बाहेर का येत नाहीत म्हणून, त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडून पाहताच त्यांना राकेश यांनी विष घेतल्याचे आढळले. त्यांचे बंधू आशुतोष यांनी त्यांना त्वरित रुग्णालयात नेले, परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. राकेश यांचे विविध व्यवसाय असून, भागीदारीतही अनेक व्यवसाय आहेत. राकेश यांच्या नातेवाईक व मित्रांनी ही आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.