स्थायी सदस्य नियुक्तीवरून पेच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नाशिक - सोळा सदस्यांच्या स्थायी समिती सदस्यांसाठी उद्या (ता. 30) महासभा होणार आहे. मात्र, शिवसेनेने विभागीय आयुक्तांनी फेटाळलेल्या प्रस्तावावरून उच्च न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयानेही याचिका दाखल करून उद्या (ता. 30)पर्यंत सुनावणी पुढे ढकलली. यामुळे समिती सदस्यांच्या नियुक्तीवरून कायदेशीर पेच निर्माण होण्याची दाट शक्‍यता आहे. 

न्यायालयाचा दाखला देत शिवसेना महासभा तहकूब करण्याची मागणी करणार आहे, असे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. 

त्यावर महापौर रंजना भानसी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महासभा सुरू होईपर्यंत न्यायालयाचा निकाल हाती न आल्यास भाजपकडून प्राप्त प्रस्तावांनुसार नावे जाहीर केली जाणार आहेत. 

सभागृहात भाजपचे 66 सदस्य आहेत. पक्षीय बलानुसार नऊ सदस्य नियुक्त होणार आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी एक अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन गटनोंदणी केल्याने दोन्ही कॉंग्रेसचे प्रत्येकी सात सदस्य झाले आहेत. त्यामुळे स्थायी समितीवरही प्रत्येकी एक सदस्याची नियुक्ती होईल. मनसेने एका अपक्षाला सोबत घेऊन गटनोंदणी केल्याने त्यांची सदस्य संख्या सहा झाली आहे. त्यामुळे मनसेचाही एक सदस्य नियुक्त होणार आहे. 35 सदस्यांच्या बळावर शिवसेनेचे चार सदस्य नियुक्त होणार आहेत. मात्र, रिपब्लिकन पक्षासोबत आघाडी करून गटनोंदणीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्ताव मंजूर झाला असता, तर शिवसेनेचे पाच सदस्य स्थायी समितीवर नियुक्त झाले असते. त्यामुळे भाजपचे सदस्यबळ एकने घटून आठवर स्थिरावले असते. त्यातून सभापतिपदासाठी विरोधक व भाजपचे प्रत्येकी आठ सदस्य झाले असते. त्यामुळे चिठ्ठी काढण्याची वेळ आली असती. त्यातून भाजपला स्थायी समितीची सत्ता गमवावी लागली असती. मात्र, विभागीय आयुक्तांनी शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जाधव यांचे नाव आघाडीवर 
स्थायी समिती सदस्यांची नावे निश्‍चित करताना भाजपने मध्य, पूर्व व पश्‍चिम विभागातून तिघांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून शशिकांत जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. तेच सभापतिपदाचे उमेदवार निश्‍चित होणार आहे. त्याव्यतिरिक्त शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, भगवान दोंदे, कावेरी घुगे, सतीश सोनवणे यांची नावे सदस्यांच्या यादीत असल्याचे समजते. कॉंग्रेसकडून राहुल दिवे किंवा समीर कांबळे यांच्यापैकी एक, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राजेंद्र महाले यांचे नाव आघाडीवर आहे. मनसेकडून अपक्ष मुशीर सय्यद यांचे नाव निश्‍चित झाले आहे. शिवसेनेने न्यायालयीन प्रक्रियेमुळे नावे निश्‍चित केलेली नाहीत. वेळेवर नावे सादर करण्याचे नियोजन आहे. 

Web Title: Shiv Sena High Court petition