शिवम वानखेडे ‘मॅड-२’च्या अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

टॉप ६ मध्ये समावेश; आज पासून वोटिंग लाईन सुरू
जळगाव - कलर्स मराठी वाहिनीवरील ‘मॅड-२’ या नृत्य स्पर्धेत जळगावचा ग्लॅडिएटर क्‍लासचा विद्यार्थी शिवम वानखेडे हा अंतिम फेरीत पोचला आहे. शिवमला विजयी करण्यासाठी आज रात्री पासून वोटिंग लाईन सुरू झाली आहे. 

नृत्य स्पर्धा ‘मॅड-२’ मध्ये जळगाव शिवम वानखेडे हा अंतिम फेरीच्या टॉप ६ मध्ये पोहचला आहे. स्पर्धेत विजेता होण्यासाठी त्याची वोटींग लाईन आज पासून रात्री साडेदहापासून सुरू झालेली आहे. शिवमला १२ एप्रिलच्या सकाळी साडे नऊ पर्यंत वोटींग करता येणार आहे. या वोटिंगमुळे तो अंतिम विजेता ठरणार आहे. यापूर्वी शिवमने स्पर्धेत मुलीच्या वेशभुषेत ‘गर गर भिंगरी’ या गाण्यावर बहारदार लावणी नृत्य सादर करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शिवमला एकाच नंबरवरून शंभर एसएमएस करून वोटिंग करता येणार आहे. जळगावचा व खानदेशचा या कलाकाराला विजेता बनविण्यासाठी वोटिंग करावे असे आवाहन नृत्य शिक्षक अखिल तिलकपुरे, शिरीष वानखेडे, सुवर्णा वानखेडे यांनी केले आहे.  

अशी करा वोटींग
शिवमला वोटींग करण्यासाठी एका मोबाईलवरून शंभर एसएमएस करता येणार आहे. मोबाईलवर एसएमएस बॉक्‍समध्ये जावून SHIV टाईप करून ५६८८२ या क्रमांकावर एसएमएस पाठवावे.

Web Title: shivam wankhede mad-2 final round