उपनगराध्यक्षपदांतही सेनेचीच बाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सहापैकी चार ठिकाणी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष; नांदगावचे उपनगराध्यक्षपद भाजपकडे

नाशिक - नगरपालिकांपाठोपाठ आज झालेल्या पालिकांच्या उपनगराध्यक्षपदांच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारली. सहापैकी नांदगाव, येवला, सिन्नर आणि भगूर येथील उपनगराध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात गेले आहे.

जिल्ह्यातील भगूर, येवला, सटाणा, सिन्नर, नांदगाव व मनमाड या सहा पालिकांमध्ये आज उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. 

उपनगराध्यक्ष निवडीत जिल्ह्यात शिवसेनेने सर्वाधिक चार जागा पटकावल्या असून, भाजप व रिपाइंला प्रत्येकी एक जागा मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदाची संधी मिळू शकली नाही. 
निवड झालेले उपनगराध्यक्ष असे ः येवला- सूरज पटणी (शिवसेना), सिन्नर- प्रमोद चोथवे (शिवसेना), भगूर- मनीषा कस्तुरे (शिवसेना), सटाणा- निर्मला भदाणे (भाजप), मनमाड- राजेंद्र आहिरे (रिपाइं), नांदगाव- शोभा कासलीवाल (शिवसेना).

उत्तर महाराष्ट्र

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यंदा संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळेतील एम. एस्सी. प्रवेशासाठी प्रथमच केंद्रीय...

02.18 AM

मालेगाव - पहिल्या पत्नीला तलाक दिला नसताना दुसरा बेकायदा निकाह करणाऱ्या औरंगाबाद येथील मजहर खान या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल...

01.27 AM

रुग्णवाहिका नाकारली; मृतदेह तहसीलसमोर नांदगाव - सततची नापिकी आणि व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्‍यातील चांदोरा येथील नामदेव...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017