मुलाचे अपहरण करणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

जळगाव ः अमळनेर येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. निखिल बहुगुणे यांचा मुलगा पार्थ (वय 13) याचे दोन जानेवारीला अपहरण करणाऱ्या सर्व सहा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अखेर बेड्या ठोकल्या. सात दिवसांच्या अथक परिश्रमाने आणि नियोजनबद्ध तपास करत पोलिसांनी हे यश मिळविले. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार व दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.

अमळनेर येथून अपहरणकर्त्यांनी पार्थ याचे अपहरण करून डॉ. बहुगुणे यांच्याकडे पन्नास लाखांची खंडणी मागितली होती; मात्र पोलिसांनी त्याच रात्री तातडीने रचलेल्या चक्रव्यूहातून पैसे व पार्थला घेऊन जाणे शक्‍य नसल्याचे दिसताच चकमकीच्या भीतीने रात्री दीडच्या सुमारास पार्थला अमळगाव येथे सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला होता. त्यानंतर पार्थने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानुसार डॉ. बहुगुणे व पोलिसांनी अमळगाव येथे जाऊन सुखरूप असलेल्या पार्थला ताब्यात घेतले होते. पार्थची सुखरूप सुटका झाली असली, तरी पाच अपहरणकर्ते फरारी होते. गुन्हे शाखेच्या पथकाने आज त्यांचा शोध लावला.

टॅग्स

उत्तर महाराष्ट्र

इगतपुरी : धनगर समाजातील घटकांच्या आरक्षण बाबत झालेल्या बाचाबाचीत भाजपचे खासदार विकास महात्मे  यांनी माजी आदिवासी...

रविवार, 25 जून 2017

वणी - सप्तश्रृंगी गडावर दरड पडण्याच्या घटनेनंतर सुरक्षिततेतच्या कारणास्तव बंद ठेवलेले मंदिर आज (रविवार) भाविकांसाठी खुले करण्यात...

रविवार, 25 जून 2017

नाशिक : 'मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र लगेच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. कारण नाशिक जिल्ह्याला या कर्जमाफीचा फारसा...

रविवार, 25 जून 2017