स्मार्टसिटी योजनेचा पहिला हप्ता दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नाशिक - स्मार्टसिटी योजनेतील प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निधीचा पहिला हप्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाला आहे. 135 कोटींची ही रक्कम असून, महापालिकेला स्वतःचा पन्नास कोटींचा हिस्सा टाकावा लागणार आहे. अर्थात, स्मार्टसिटीसाठी स्थापण्यात आलेल्या एसपीव्ही कंपनीत तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केल्यानंतरच प्रकल्पांसाठी निधी खर्च करावा लागेल. 

गेल्या वर्षी स्मार्टसिटीमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आला. त्यापूर्वी महापालिकेने स्मार्टसिटी संकल्पना अमलात आणण्यासाठी सुमारे दोन हजार कोटींचे प्रकल्पांचे नियोजन केले आहे. स्मार्टसिटीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुक्रमे 50 व 25 टक्के सहभाग आहे. महापालिकेला 25 टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. दर वर्षी असे पुढील पाच वर्षे केंद्र सरकारकडून पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत. पहिल्या वर्षाच्या शंभर कोटींपैकी नव्वद कोटींचा पहिला हप्ता प्राप्त करून घेण्यासाठी महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने 45 कोटी रुपये दिले आहेत, असे एकूण 135 कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत जमा होतील. महापालिकेला पन्नास कोटींची तरतूद करावी लागणार आहे. स्मार्टसिटीसाठी असे एकूण दर वर्षी दोनशे कोटींची तरतूद होणार आहे. ग्रीन फिल्ड, पॅनसिटी व रेट्रोफिटिंग या तीन प्रकारांत स्मार्टसिटी साकारली जाणार आहे. प्रारंभी पॅनसिटी प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. तज्ज्ञ सल्लागार नियुक्त झाल्यानंतरच स्मार्टसिटीसाठी तरतूद केलेला निधी खर्च करता येईल. 

Web Title: Smart City filed the first installment of the scheme