इगतपुरी - आदिवासी भागात राब भाजणीस प्रारंभ 

विजय पगारे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

इगतपुरी : तालुक्यातील पाश्चिम पट्टयातील आदिवासी भागासह विविध भागात बळीराजा पेरणीपूर्व मशागतीत गुंतला असून त्याचाच एक भाग म्हणजे राबभाजणी. भात व नागलीचे बियाणे पेरणी करण्यापुर्वी शेतातील एका कोपऱ्यात जमिनीची भाजणी केली जाते पालापाचोळा, गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिले जाते. यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाते शिवाय जमिन भूस भूसीत होते. अशा भाजणीच्या जागेवर भात व नागालीचे रोपे तयार केली जातात. आदिवासी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जून मध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल पासूनच सुरू होत असते.

पर्यावरण संरक्षणाचा संदेश 
आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र अशा कामासाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत.उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत,खत व इतर सुका पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो यात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतात.यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारत असतो.

Web Title: starting a farming in tribal areas in igatpuri