इगतपुरी नगर परिषदेची वसुली मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

इगतपुरी - "मार्च एंड'च्या पार्श्‍वभूमीवर इगतपुरी नगर परिषद कर विभागातर्फे आज शहरात धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत दोन कंपन्या व तीन जणांच्या गाळ्यांवर कारवाई करीत "सील' करण्यात आले, अशी माहिती कर निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

इगतपुरी शहरातील तळेगाव औद्योगिक वसाहतीतील सार कनेक्‍ट, शम्स प्लास्टिक इंडस्ट्रीज; तर मानस लाइफस्टाइल परिसरातील कमलाकर पवार, भाजी मंडईतील दोन व्यापारी असे एकूण पाच थकीत मिळकत कर न भरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा ते चारच्या सुमारास ही कारवाई केली. सार्क कनेक्‍ट, शम्स प्लास्टिक इंडस्ट्रीज या दोन्ही कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित करून कार्यालय "सील' करण्यात आले. तिघांच्या गाळ्यांना "सील' करण्यात आले. दरम्यान, शम्स प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीकडे थकीत असलेल्या तीन लाख 65 हजार रकमेपैकी एक लाख रुपयांचा धनादेश पालिकेला देण्यात आला. भाजीमंडईतील एका भाजी व्यावसायिकाने 13 हजार 900 रुपये रोख भरल्याने त्यांचे "सील' काढण्यात आले. मोहिमेत मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, कर निरीक्षक अनिल पाटील, कर्मचारी एजाज शेख, अजय वर्दे, रफीक शेख, बाळू दालभगत, क्रिष्णा गायकवाड, संतोष गायकवाड, विकी जिनिवाल, गणपत अवघडे सहभागी झाले होते.

Web Title: Tax collection in Igatpuri by corporation