मल्टीपर्पज शैक्षणिक साधन निर्मिण करणारा शिक्षक

Teacher makes of multi-skilled educational equipment
Teacher makes of multi-skilled educational equipment

धुळे : मल्टीपर्पज शैक्षणिक साधन निर्मिती स्वतः करायची. त्यासाठी टाकाऊपासून टिकावू साधनांची निर्मिती करायची, विद्यार्थ्यांना  अध्ययनात रमवून ठेवायचे. शैक्षणिक उपक्रमांपासून थेट समाजोपयोगी उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येते.  वृक्षारोपनापासून हर्बल गार्डन निर्मिती केली. नियमित शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची गोडी प्राथमिक शिक्षणापासून लावण्याचा छंद त्यांच्या पहिल्या विद्यार्थ्याने आयआयटीच्या माध्यमातून तयार केलेला रोबो आदी त्यांच्या शैक्षणिक बहुमोल कामाची पावती पुरस्काराहून कमी नाही.

लोणखेडी (ता.साक्री) येथील जिल्हा परीषद शाळेतील युवा शिक्षक राकेश जाधव यांची पंधरा वर्षांत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात असाधारण कामगिरी सुरु आहे. 

मल्टीपर्पज शैक्षणिक साधन निर्मिती
जाधव सर हे दोन वर्षांपासून लोणखेडी शाळेत कार्यरत आहेत. शिक्षकांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचे रुपडे पालटून टाकले आहे. हार्ड बोर्ड, मॅजीक बॉक्स, मल्टी बोर्ड, शब्द पट्टा, सापशिडीच्या खेळातून वाचन आणि गणित उदाहरणे, खेळ शब्द चौकटीचा, अक्षरे खेळ बुध्दीबळाचा, ठोकळे आदी शंभरावर विविध प्रकारची साधन निर्मिती केली आहे. साधनांमध्ये सर्जनशिलता आणि सृजनशिलतेचा संगम पाहायला मिळतो. 

हर्बल गार्डन शाळेच्या आवारात दीडशे निम व वृक्ष लावून संवर्धित केली आहेत. हर्बल गार्डनची निर्मिती हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग साधला आहे. यात अडुळसा, तुळस, गवती चहा आदी वनस्पती आहेत. ठिबकच्या माध्यमातुन पाणी पुरवठा केला जातो. विद्यार्थी गार्डनची निगा राखण्यासाठी राबतात.

पहिला विद्यार्थी आयटी अभियंता
जाधव हे करमाळा सोलापूर तालुक्यात तेरा वर्षे होते. तेथील चेतूर शाळेला जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा बनविली. स्वतः पंधरा दिवस शाळेला रंगरंगोटी केली होती. प्रत्येक वर्षी नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांचे विद्यार्थी चमकत. त्यांचा पहिला विद्यार्थी प्रवीण राऊतने आयआयटी पवईत रोबो बनविला. अन गुरुजी हे तुमच्यामुळे असे सांगत श्रेयही दिले होते.

जाधव हे लोणखेडी येथे अरुण कुवर, गोकुळ पाटील, मुकेश कोळी, सुकलाल बोरसे, पंकज चौधरी व योगेश सोनवणे या शिक्षकांच्या सहकार्यातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. ग्रामविकासाच्या संकल्पना मांडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com