चाळीसगाव - खराडीकरांच्या नशिबात 'नळ'च नाहीत

दीपक कच्छवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : अनेक वर्षांच्या रहाटगाड्यात पाण्यासाठी जीवन व्यतीत करणाऱ्या खराडी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांची दैना ऐकून अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. खराडीकरांच्या शंभर वर्षात 'नळ' ही संकल्पनाच माहीत नसून यागावात एकही नळ नाही. सुरू केलेली थातुरमातुर पाणीसपुरवठा योजना तीही निष्क्रिय ठरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना दाही दिशा फिरावे लागत आहे.

मेहुणबारे (चाळीसगाव) : अनेक वर्षांच्या रहाटगाड्यात पाण्यासाठी जीवन व्यतीत करणाऱ्या खराडी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांची दैना ऐकून अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. खराडीकरांच्या शंभर वर्षात 'नळ' ही संकल्पनाच माहीत नसून यागावात एकही नळ नाही. सुरू केलेली थातुरमातुर पाणीसपुरवठा योजना तीही निष्क्रिय ठरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना दाही दिशा फिरावे लागत आहे.

चाळीसगाव शहरापासून बावीस किलोमीटरवरअसलेल्या  खराडी (ता.चाळीसगाव) हे गाव शंभर टक्के मागसवर्गीय आहे. या गावाची ग्रुप ग्रामपंचायत ही घोडेगाव आहे. खराडी गावाची लोकसंख्या पाचशेच्या घरात आहे.या गावात पिण्याच्या  पाण्यासाठी महिलांसह घरातील सर्वच सदस्यांना दुरवर भटकंती करून पाणी आणावे लागत  आहे.प्रशासनाने या गावातील  ग्रामस्थांचा पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा आशी मागणी येथे जोर धरू लागली आहे.

गावात 'नळ'च नाही
खराडीकरांच्या नशिबात गेल्या शंभर वर्षापासुन पिण्याच्या  पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.यांची ही भटकंती तरी कधी थांबणार ? असा देखील प्रश्न आता निर्माण होत आहे. या गावात 'नळ' म्हणजे काय ?  हेच माहीत नसल्याचा प्रश्न  उपस्थितीत केला जात आहे.येथे ग्रामंचायतीने पाणी पुरवठा योजनेसाठी गावापासून काही अंतरावर विहीर देखील खोदली आहे.या विहिरीवरून येथील गावात ठेवण्यात आलेले प्लास्टिकची पाच हजार लिटरची पाण्याची टाकी पर्यंत पाईप लाईन देखील आलेली आहे.परंतु गावात त्या पाईपलाईन द्वारे नळ कनेक्शन दिलेलेच नाही.ती योजनेची पाणी तीन वर्षातुन दोन वेळाच टाकीत पडले आहे.

या ठिकाणी झालेली ही पाण्याची योजनाच थातुरमातुर आहे. ही योजना देखील आपुर्ण अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी  केला आहे.गेल्या दोन वर्षापुर्वी येथील गावातील वयोवृद्ध व्यक्ती विहिरीतून पाणी काढतांना पडला होता. या गावात प्रशासन पाण्यासाठी जीव जाण्याची प्रशासन वाट तर पहात नाही ना? असा देखील प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.या ठीकाणी आसलेली पाण्याच्या योजनेची प्लास्टीक टाकी जणु काही शोपीस ठरली आहे.आदिवासी भागासाठी शासनाच्या खुप योजना आहेत.परंतु या भागात सध्या तरी कुठल्याच योजना पाहीजे तश्या राबविल्या जात नाही.त्यामुळे या ग्रामस्थांचा सध्याचा महत्वाचा पाण्याचा प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावा आशी मागणी होत आहे.

येथील आजुबाजुच्या विहिरीवरून पाणी आणतांना शेत मालक पाणी भरू देत नाही.अक्षरक्षा पिण्याचे पाणी चोरून भरावे लागते.आशी वळ आमच्यावर आहे.प्रशासनाने तातडीने आमची पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिलाबाई कडांगळे यांनी केली. 

माझे दहा लोकांचे कुटुंब आहे.ऐवढ्या कुटुंबाला घरात खुपच पाणी लागते.आजुबाजुच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. या पाण्यामुळे घरात सर्दी खोकला, ताप असे साथीचे आजाराची लागण होत आहे.तरी आम्हाला शासनाने शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे, असे मिराबाई सोनवणेंनी सांगितले. 

आमचे गाव शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. तीन वर्षापुर्वी पाण्यासाठी हांडा मोर्चा काढला होता.या उन्हाळ्यात आम्हाला पाण्यासाठी दुरवर  पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने आमचा पाणी प्रश्न लवकर सोडविला नाही तर पुन्हा हंडा मोर्चा काढु, असे लक्ष्मण महाले म्हणाले. 

हातपंपाचा दिलासा
खराडी येथील गावात तीन हातपंप आहेत. एका हातपंपाला चांगले पाणी आहे. दोन हातपंप  नादुरुस्त आहेत.सध्या या हातपंपाचे पाणी गुरांणा घरात वापरण्यासाठी उपयोग केला जात आहे.या हातपंपाचे पाणी पिण्यायोग्य नसुन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.मात्र टंचाई काळात हा एक हातपंप खराडीकारांना दिलासा देतोय.

येथील गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या तीन विहीरी मोरदरा धरणात खोदण्यात आल्या परंतु एकाही विहीराला पाणी लागले नाही. पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने राजदेहरे शिवारातील मारवाडी धरण परिसरात विहीर खोदण्याचे काम सुरू केले आहे, असे खराडीचे ग्रामसेवक बी.एस.पाटील यांनी सांगितले. 

Web Title: there is ni water tap in kharadi chalisgao