नाशिकला युवकाकडे सापडले वाघाचे कातडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नाशिक - वाघाच्या कातड्याची विक्री करण्यासाठी कॉलेज रोड परिसरात आलेल्या ओंकार राजेंद्र आहेर (19, रा. गजरा पार्क, कमोदनगर, इंदिरानगर) या तरुणाला सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. कातड्याची किंमत 25 लाख रुपये आहे. याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडील कातडे तपासणीसाठी हैदराबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. 

वाघाचे कातडे विक्रीसाठी संशयित येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक वाय. डी. उबाळे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने कॉलेज रोड परिसरात पाळत ठेवली. त्या वेळी ओंकार आहेर संशयास्पदरीत्या फिरताना आढलला. झडतीमध्ये त्याच्याकडील बॅगेत दोन फूट नऊ इंचाचे वाघाचे कातडे आढळले. वाघाच्या तोंडापासून ते शेपटीपर्यंत सुमारे दोन फूट नऊ इंच लांबीचे कातडे आहे.