शेटे कुटुंबीयांमुळे आदिवासी बांधवांची दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

यंदाचे चौथे वर्ष; अडावद परिसरात होतेय कौतुक
अडावद (ता. चोपडा) - जिल्हा परिषदेचे वराड (ता. चोपडा) येथील शिक्षक संजीव शेटे यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांचे हे चौथे वर्ष असून, विविध उपक्रमात ते अग्रेसर आहेत.

यंदाचे चौथे वर्ष; अडावद परिसरात होतेय कौतुक
अडावद (ता. चोपडा) - जिल्हा परिषदेचे वराड (ता. चोपडा) येथील शिक्षक संजीव शेटे यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांचे हे चौथे वर्ष असून, विविध उपक्रमात ते अग्रेसर आहेत.

दिवाळी सर्वत्र धुमधडाक्‍यात होत असते. श्रीमंतांकडे पैसा असतो तर त्यांची दिवाळी मोठ्या उत्साहात असते. मात्र, गरिबांकडे कोण लक्ष देणार याची जाण ठेवत आदिवासी कुटुंबीयांसाठी आपण काही देणे लागावे या हेतूने श्री. शेटे यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यांच्या मित्र परिवारात फिरून ते साबण, तेल आदी वस्तूंची मागणी करतात. या सर्व वस्तू, फराळाचे साहित्याचे पॅकिंग करून ठेवतात. त्यानंतर ते धनवाडी फाट्याजवळील आदिवासी वस्तीत जाऊन त्यांना या भेटवस्तू देवून त्यांच्यासमवेत दिवाळी मनवितात. या पाड्यात सुमारे 50 घरे आहेत. तेथील सुमारे शंभर आदिवासी विद्यार्थ्यांना ते आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आदींबाबत मार्गदर्शनही करतात. गेल्या चार वर्षापासून आदिवासी बांधवांमध्ये ते दिवाळी साजरी करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

दिवाळीत आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते अशा भावना त्यांनी व्यक्‍त केल्या.
 

उत्तर महाराष्ट्र

जुने नाशिक - रामकुंड परिसरातील कपालेश्‍वर पोलिस चौकीशेजारी असलेले बोरीचे झाड आज दुपारी कोसळल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. या...

11.54 AM

व्यावसायिक धास्तावले; पूर पाहण्यासाठी गर्दी पंचवटी - काल (ता. १९) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज जलसंपदा विभागाने...

11.54 AM

पूर्वसंध्येला बळीराजाची तयारी; मातीच्या बैलांनाही मागणी नाशिक - वर्षभर शेतीसाठी अपार कष्ट करून आपला मळा फुलविणाऱ्या सर्जा-...

11.54 AM