'समृद्धी'साठी सक्तीच्या भूसंपादनाच्या हालचाली सुरू 

samruddhi
samruddhi

इगतपुरी : प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी सक्तीचे भूसंपादन चालू करण्याच्या हालचाली सुरू असताना बाधित क्षेत्रातील गावांमध्ये थेट ग्रामसभा घेत शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत याबाबत नुकतीच इगतपुरी तालुक्यातील तळोशी, तळोघ, कांचंनगाव पिंपळगाव मोर आदी गावांमध्ये प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. 

शेतकऱ्यांमध्ये विरोधाचा सूर मावळला असल्याचे वाटत असतानाच अवचितवाडी व तळोशी येथे मात्र शासनाने ठरवलेला रेडिरेकनरचा दर शेतकऱ्यांना मान्य नसून भूसंपादन कायद्याप्रमाणे संपूर्ण मोबदला देऊन पुनर्वसनाचीही तरतूद करावी,बाधित होणाऱ्या पाईपलाईन यांचा मोबदला मिळावा,नष्ट होणारे पाण्याचे स्रोत पुर्ववत करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे तर राहिलेल्या जमिनी लवकर खरेदी द्याव्यात जेणेकरून मोबदला कमी होणार नाही अशी विनवणी अधिकारी वर्ग शेतकऱ्यांकडे करत आहे.

तालुक्यात आत्तापर्यंत जवळपास 72 टक्के खरेदी झाली असून उर्वरीत जमिनी लवकरात लवकर खरेदी पूर्ण करून शासनाच्या स्वाधीन करण्यासाठी अधिकारी मात्र आटापिटा करताना दिसत आहेत यावेळी ग्रामसभेस भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार अनिल पुरे,मंडळ अधिकारी बोरसे,समृद्धी बाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ,रस्ते विकास महामंडळाचे अभियंता पी व्ही सोयगावकर ,सरपंच बिलाबाई गिरे, पोलिस पाटिल नीता गुंजाळ,उपसरपंच त्र्यंबक गुंजाळ,रेवणनाथ गुंजाळ,पोपट गुंजाळ,भाऊसाहेब गुंजाळ,तलाठी एम एस मार्कंड,पांडुरंग गिते,मच्छीन्द्र गुंजाळ पंढरी गुंजाळ,अशोक डोळस आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

शासनाने समृद्धी महामार्गाच्या संपादनासाठी अतिशय जुनाट असा 1955 चा कायदा वापरला आहे आमची सत्तावीस महिन्यांपासून लढाई चालू असताना भूसंपादन 2013 च्या कायद्या प्रमाणे मोबदला मिळावा हि प्रथम मागणी आहे मात्र सामान्य शेतकरी वर्गाला ह्या कायद्याविषयी जागृत न करता उलट बागुलबुवा दाखवून शेतकऱ्यांच्या अडाणी पणाचा फायदा घेत अधिकाऱ्यांनी खरेदीचा टक्का वाढवला आहे मात्र शासनाला कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन कायदा 2013 हा लागू करण्यास भाग पाडू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ "
- भास्कर गुंजाळ अध्यक्ष, समृद्धी बाधित संघर्ष समिती इगतपुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com