शहर स्वच्छतेसाठी यांत्रिकी झाडूचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

प्राथमिक चाचणीनंतर कामास भाडेतत्त्वावर सुरवात 

नाशिक - शहर स्वच्छतेसाठी आता महापालिकेकडून यांत्रिकी झाडूचा पर्याय वापरला जाणार आहे. यासाठी प्राथमिक चाचणीनंतरच हे काम संबंधितास देण्यात येईल. हे सर्व भाडेतत्त्वावर चालविले जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. काम जर समाधानकारक वाटल्यास हे पुढे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरात सध्या स्वच्छता ठेवण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याने शहरातील अनेक प्रभागांमध्ये स्वच्छता होत नाही. यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न भेडसावतो. यावर उपाय म्हणून यांत्रिकी झाडूंचा पर्यायाचा शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून विचार केला जात आहे. सदर यांत्रिकी झाडू खरेदी करण्याची क्षमता महापालिकेकडे नसून, तसेच या यांत्रिकी झाडूची किंमतही कोट्यवधीच्या घरात आहे. तसेच, यासाठी पहिल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे प्रथम भाडेतत्त्वावर हा प्रयोग शहरात राबविला जाणार आहे. यासाठी प्राथमिक चाचणी पाहूनच हा कितपत उपयोगी आहे, याचा विचार केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

टॅग्स