४२ घंटागाड्यांमध्येच कचऱ्याचे विलगीकरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नाशिक - शहरातील २०६ घंटागाड्यांपैकी फक्त ४२ घंटागाड्यांमध्येच ओला व सुका कचरा संकलित करण्याची सोय असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातून ठेकेदारांची बनवाबनवी समोर आली आहे. यासंदर्भात आयुक्तांना सादर केलेल्या अहवालावर लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता असून, कराराचा भंग झाल्याने दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्‍यता आहे.

शहरात २०६ घंटागाड्यांद्वारे घनकचरा संकलित केला जातो. कचरा संकलन करताना ठेकेदारांबरोबर केलेल्या करारात ओला व सुका कचरा संकलित करण्याचे नमूद केले आहे. प्रथम घंटागाडीत कचरा विलगीकरणाची सोय करावी, त्यानंतर नागरिकांवर कचरा संकलनाचे बंधन घालण्याचे नियोजन आहे. मात्र, ठेकेदारांकडून घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कचरा डेपोत सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे यांना पूर्ण दिवस थांबून घंटागाड्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. हिरे यांनी अहवाल तयार केला असून, त्यात २०६ पैकी ४२ घंटागाड्यांमध्येच कचरा विलगीकरणाची सोय असल्याचे समोर आले आहे. १६४ घंटागाड्यांमध्ये सोय नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.