चाळीसगाव तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती

water
water

चाळीसगाव - वातावरणात सध्या उन्हाची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांश ठिकाणी गंभीर होत चालला आहे. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याचा स्तर हळूहळू खालावत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावरच जलपातळी खालावल्याने पावसाळा येईपर्यंत यापेक्षाही भयावह स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक गावांमध्ये पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्यातील कठीण असलेला मे महिना पंधरा दिवसांवर आल्याने सध्या आहे, पाण्याची बचत करणे सर्वांसाठीच आवश्यक आहे.

चाळीसगाव तालुक्यातही बहुतांश भागात पाणी टंचाईचा प्रश्न जोर धरू लागला आहे. तालुक्यातील राजमाने, दरातांडा, शिंदी, खराडी, घोडेगाव यासारख्या अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटल्याने या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. समाधानकारक पर्जन्यमानाला जेवढी नैसर्गिक स्थिती कारणीभूत आहे, तितकीच पाणी टंचाईला स्थानिक प्रशासन जबाबदार आहेत. याचबरोबर नागरिकही काही प्रमाणात कारणीभूत आहेत.

विहिरींचे अधिग्रहण...
काही गावांमध्ये आसपासच्या विहिरी अधिग्रहण करून पाणीप्रश्न काही प्रमाणात मिटण्यासारखा आहे. परंतु, स्थानिक राजकारण, अंतर्गत मतभेद, हद्दीतले वाद ही कारणे पाणी टंचाईच्या भीषणतेवर फुंकर घालत आहेत. सगळे वादविवाद, मतभेद विसरून पाण्यासाठी एकत्र आलात, तर गावचाच फायदा आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.  याउलट काही गावांमध्ये काही ग्रामस्थ पिण्यासाठी आपापल्या विहिरी अथवा कूपनलिकांचे पाणी खुले करून देत आहेत. 

पाणी मिळतेय, तर जपून वापरा...
गिरणाकाठचे तालुके व गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे नदी लगतच्या व आसपासच्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ज्यावेळी ग्रामस्थांना पाणी नव्हते, त्यावेळी जशी काटकसर होत होती. तशी काटकसर सध्या दिसत नाही. नदी वाहतेय म्हणून कसाही पाण्याचा वापर आणि अपव्यय करायचा आणि टंचाई निर्माण झाली की इतरांवर दोषारोपण करणे हे नेहमीचेच. त्यामुळे जेवढी पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्याहून अधिक काटकसरिची जबाबदारी नागरिकांची आहे; परंतु ही बाब क्षुल्लक वाटत असल्याने कोणीच ध्यानात घेत नाही. 

गिरणा धरणात केवळ 19 टक्के साठा...
सध्या गिरणा धरणात जेमतेम 19 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी पाऊस कसा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे धरणाचे पाणी जपून वापरणे हेच आपल्या सर्वांसाठी हितकारक आहे. आपल्या जलस्रोतांची काळजी घेणे हे आद्य कर्तव्य समजून भविष्यातील पाणी टंचाईला रोखता येऊ शकते. अन्यथा 'कुठं कुठं जायाचं पाण्याला?' हा प्रश्न उद्भवल्याशिवाय राहणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com