'गिरणा'चा साठा दोन टक्क्यांनी वाढला

'गिरणा'चा साठा दोन टक्क्यांनी वाढला

पिलखोड (ता. चाळीसगाव)  : गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे चणकापूर व पुनद धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणाच्या साठ्यात मंगळवारी(ता. 17) दिवसभरात एका टक्क्याने वाढ झाली तर, रात्रीतून एका टक्क्याने वाढ होत आज सकाळी धरण 12 टक्क्यांपर्यंत पोचले आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली. 

राज्यात सक्रिय होत असलेला पाऊस नाशिक जिल्ह्यातील गिरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला होत आहे. त्याची फलश्रुती म्हणून चणकापूर व पुनद धरणाच्या साठ्यात चांगली वाढ होत आहे.  चणकापूर धरणातून दोन हजार 68 क्यूसेक तर पुनद धरणातून दोन हजार 426 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या दोन्ही धरणांचे एकत्रित मिळून ठेंगोडा बंधाऱ्यातून पाच हजार 102 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणात सुरू आहे. 

गिरणाच्या साठ्यात दोन टक्क्याने वाढ होऊन 11.73 म्हणजेच 12 टक्के साठा झाला आहे. धरणात एकूण पाच हजार 170 दशलक्ष घनफुट साठा निर्माण झाला असून दोन हजार 170 दशलक्ष घनफुट जिवंत साठा शिल्लक आहे. अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली. धरणात सध्या सुरू असलेली आवक कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com