लग्नसोहळ्यांना "शाही' बनविणाऱ्या फेट्यांची "क्रेझ'! 

लग्नसोहळ्यांना "शाही' बनविणाऱ्या फेट्यांची "क्रेझ'! 

जळगाव - लग्नसमारंभ असो की सांस्कृतिक कार्यक्रम; प्रत्येक कार्यक्रमात फेटा हा घालावासा वाटतोच. त्याची "क्रेझ' प्रत्येकालाच असते. विशेषकरून लग्नसोहळ्यात नवरदेवाने घातलेल्या फेट्याचे खास आकर्षण असते. नवरदेवासोबतच वऱ्हाडी मंडळींच्या डोक्‍यावर तुरेदार फेटे चढविले की सोहळ्याला "शाही' स्वरूप प्राप्त होते. गेल्या काही वर्षांत फेट्यांच्या स्वरूपातही बदल झाले असून, अलीकडच्या काळात राजस्थानी, जोधपुरी, प्रिंटेड, नेट, कॉटन, बांधणी या प्रकारांतील मिक्‍स कलर असलेल्या कापड व डिझाइननुसार फेटे उपलब्ध आहेत. 

डिझायनर फेट्यांना मागणी 
सध्या डिझायनर वस्तूंची मोठी "क्रेझ' आहे; त्याचप्रमाणे फेट्यांमध्येही डिझायनर हा प्रकार मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. या डिझायनर फेट्यांना मोती वर्क, विविध प्रकारांतील बॉर्डर व लेस लावून तयार केले जाते. त्यामुळे त्याला वेगळेच रूप मिळते. या डिझायनर फेट्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ते दोन रंगांनी बनविलेले असतात. त्यामुळे हे फेटे युवकवर्गात अधिक लोकप्रिय ठरले आहेत. वेलवेट व सॅटिनच्या कापडापासून तयार केलेले हे डिझायनर फेटे नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

महिलांमध्येही फेट्यांची "क्रेझ' 
दिवसेंदिवस काळ बदलत चाललेला आहे. ज्याप्रमाणे महिला पुरुषांच्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, त्याप्रमाणेच त्यांच्या वेशभूषेतही बदल होत आहेत. पूर्वी सणासुदीला नऊवारी नेसून डोक्‍यावर पदर घेतलेली स्त्री आज सांस्कृतिक कार्यक्रम, सण- उत्सव, धार्मिक कार्यक्रम, विशेष सामाजिक कार्यक्रमांमध्ये फेटा घालून बघायला मिळते. सोबतच ढोल पथक, शाळांमधील कार्यक्रम यात खासकरून हा पेहराव पाहायला मिळतो. नऊवारी साडीवर फेटा घातल्यास महिला अधिक रुबाबदार दिसतात. 

फेटे विकत घेण्यावर भर 
पूर्वी म्हणजे दहा वर्षांपूर्वी लग्नासाठी अथवा कार्यक्रमासाठी फेटे भाड्याने घेतले जात असत. आता मात्र फेटे सरळ विकत घेतले जातात. त्यामुळे फेट्यांची विक्री वाढली आहे. नवीन पद्धतीचे फेटे महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनदेखील मागविले जात आहेत. 

सिंपल फेट्यावर पॅचचा "टचअप' 
ज्याप्रमाणे डिझायनर फेट्यांची "क्रेझ', त्याचप्रमाणे सिंपल; पण "सोबर' हा ट्रेंडही बाजारात बराच लोकप्रिय आहे. या ट्रेंडनुसार अनेक लोक साध्या फेट्यावर डायमंडने सजविलेल्या विविध आकार व डिझाइनच्या पॅचचा टचअप करतात. यामुळे हे ते पाहताचक्षणी नजरेत भरले जातात. हे फेटे खासकरून व्यावसायिक कार्यक्रमांना परिधान केले जातात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com