नागपूर विद्यापीठ : कुलगुरूपदासाठी मुलाखती 30 पासून, या उमेदवारांना दिली सूचना... 

Interviews for the post of Vice Chancellor of Nagpur University from 30 th July
Interviews for the post of Vice Chancellor of Nagpur University from 30 th July

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नियमित कुलगुरू मिळावा यासाठी 30 आणि 31 जुलै रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात जवळपास 30 पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे मुलाखतीची सूचना देण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने या मुलाखती होणार असून, त्यासाठी विद्यापीठातील दिग्गज्जांचा समावेश असल्याचे समजते. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ सात एप्रिल रोजी संपला. त्यानंतर प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. मुरलीधर चांदेकर यांचाकडे देण्यात आली. त्यापूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळावा यासाठी 19 मार्चला जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. कुलगुरूपदासाठी अर्ज करताना, ना हरकत प्रमाणपत्र संबंधित विभाग वा महाविद्यालयातून मिळवावे लागत असल्याने टाळेबंदीत ते मिळणे अशक्‍य असल्याची बाब समोर आली होती. 

त्यामुळे प्रक्रियेतील नोडल अधिकारी प्रो. प्रेमकुमार यांनी टाळेबंदीनंतर अर्जाची हार्डकॉपी सादर करण्याची मुभा देण्याचे ठरले. यानुसार नोडल अधिकारी प्रो. प्रेमकुमार यांना संपर्क केला असता, त्यांनी 20 एप्रिल शेवटच्या तारखेनंतर ई-मेलच्या माध्यमातून जवळपास 132 हून अधिक उमेदवारांनी अर्ज आणि बायोडाटा पाठविला. त्यात विद्यापीठातील कुलगुरू, माजी कुलगुरूंसह दिग्गजांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचेही माहिती समोर आली होती. 

निवड ऑगस्टमध्ये 


प्रामुख्याने डॉ. विनायक देशपांडे, डॉ. के. सी. देशमुख, डॉ. राजू मानकर, डॉ. जी. एस. खडेकर, डॉ. कुंडल, डॉ. ज्योत्सना मेश्राम, डॉ. अनंत देशमुख यांच्यासारख्या नावांचा समावेश होता. आता मुलाखतीसाठी जवळपास 30 उमेदवारांना पात्र करण्यात आले असून, त्यांच्या 30 आणि 31 जुलैदरम्यान मुलाखती घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून राज्यपालांच्या मुलाखतीसाठी अंतिम पाच उमेदवारांची नावे निवडण्यात येणार आहे. त्यापैकी एकाची निवड विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर होईल. ही निवड ऑगस्ट महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला होण्याची शक्‍यता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com