esakal | नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर 
sakal

बोलून बातमी शोधा

theft incidents are increasing in Nagpur read full story

त्यात भर म्हणून चार नव्या घटना प्रतापनगर, हिंगणा, सोनेगाव, यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.

नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर 

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर :  शहरात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, चोरी, जबरी चोरीच्या अनेक घटना काही दिवसांपासून समोर येत आहेत. त्यात भर म्हणून चार नव्या घटना प्रतापनगर, हिंगणा, सोनेगाव, यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.

प्रतापनगर हद्यीतील अग्ने ले-आऊट, खामला येथील रहिवासी श्रेय शशिकांत बागडे (३२) मंगळवारी रात्री घराला कुलूप लावून परिवारासह वर्धा येथे महालक्ष्मीसाठी गेले होते. त्यांच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून बेडरुममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व ६० हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख ३० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

क्लिक करा - आयुक्त मुंढेच्या बदलीसाठी कोणी केला समझोता?, वाचा सविस्तर

माजरी सातमा मस्जिदजवळील रहिवासी तबस्सूम खातून अमजद अली (३२) गुरुवारी रात्री मुलगा अल्तमस (१२) याला सोबत घेऊन कामठी नाक्याजवळील आयसीआयसीआय बँकच्या एटीएममध्ये गेल्या. एटीएममधून १५ हजार रुपये काढले. रक्कम आणि एटीएम कार्ड पर्समध्ये ठेवून पायी येत असताना पाटीलनगरकडे जाणाऱ्या पुलाजवळ रोडवर अंदाजे २० वर्षे वयोगटातील एक अनोळखी मागून आला. रोख रक्कम, एटीएम, आधार कार्ड असलेली पर्स बळजबरीने हिसकावून नेली.

मॉर्डन हाउसिंग सोसायटी, प्रतापनगर येथील रहिवासी योगेश नागपुरे (४०) यांनी २४ ऑगस्टला बांधकामासाठी संगम खैरी येथील हायवेवरील पुलाजवळ लोखंडी प्लेट, तराफे, कपलॉक, बिम असे एकूण १ लाख ६० हजारांचे लोखंडी साहित्य आणून ठेवले होते. चोरट्याने हे साहित्य चोरून नेले. २५ ऑगस्टला ही घटना उघडकीला आली. 

जाणून घ्या - रोजगार मिळावा म्हणून विकली वडिलोपार्जित शेती.. पण पैसे देताच बाहेर आले धक्कादायक सत्य; नक्की काय घडले

नरेंद्रनगरातील रहिवासी सचिन माणीकराव वंजारी (३७) यांनी सोनेगाव हद्यीतील पोलोसर इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. खापरी मेट्रोस्टेशनचे बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये एमएच पावडर परफोरेट व पीव्हीसी पाईप असा एकूण ७० हजारांचा मुद्येमाल ठेवला होता. गोडाउनमधील स्टोअर कीपर सचिन भलावी याने गुरुवारी पहाटे पाहणी केली असता ७० हजारांचा माल दिसला नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता तीन ते चार आरोपी हे साहित्य गोडाऊनच्या आवारातून घेऊन जाताना दिसले.

.संपादन - अथर्व महांकाळ