30 टक्के रेशनकार्डचे आधार लिंक नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

अकाेला : रेशनकार्ड आधारसोबत लिंक करण्याचे काम सध्या ठप्प झाले असून, अद्याप शहरातील ३० टक्के नागरिकांचे रेशनकार्ड आधार लिंक झाले नाही. संबंधित कंत्राटदाराने काम बंद केले असून, या अर्धवट कामामुळे पुरवठा विभागाच्या कामाचा बाेजवारा उडाला आहे.
 

अकाेला : रेशनकार्ड आधारसोबत लिंक करण्याचे काम सध्या ठप्प झाले असून, अद्याप शहरातील ३० टक्के नागरिकांचे रेशनकार्ड आधार लिंक झाले नाही. संबंधित कंत्राटदाराने काम बंद केले असून, या अर्धवट कामामुळे पुरवठा विभागाच्या कामाचा बाेजवारा उडाला आहे.
 
अकाेला जिल्ह्यातील रेशनकार्ड आधार लिंक करण्याचे काम सुरू हाेते. मात्र हे काम मध्येच बंद पडले आहे. कंत्राटदाराने काम बंद केल्याची माहिती आहे. एकूण रेशनकार्डधारकांपैकी ३० टक्के रेशनकार्डचे आधार लिंक होणे शिल्लक आहे. यामुळे पुरवठा विभागाच्या कामात गाेंधळ उडाला आहे. याचा त्रास रेशनकार्डधारकांनाही हाेत आहे. पुरवठा विभागाकडून आलेल्या धान्याची नाेंद ठेवण्यात दुकानदारांना अडचणी निर्माण हाेत आहेत. याविषयी दुकानदारांनी अनेकदा तक्रारी केल्या. नागरिकांनीही पुरवठा विभागाशी संपर्क साधला. मात्र तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. यासंदर्भात अधिक माहितासाठी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्या भ्रमणध्वनीने प्रतिसाद दिला ऩाही.

 

  • हेल्पलाईनही कुचकामी

रेशनकार्ड अनेकदा मशीनसाेबत लिंक हाेत नाहीत. मशीन अंगठे देखील स्वीकारत नाही. यासंदर्भात देण्यात आलेली हेल्पलाईनदेखील काही उपयाेगी नसल्याचे दिसून येते. १८००८३३३९०० हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला. मात्र या नंबरवर काहीच प्रतिसाद मिळत नाही. याविषयी तक्रार केली असता, त्याचाही उपयाेग झाला नाही, अशी नागरिकांची व दुकानदारांची आेरड अाहे.

Web Title: 30 percent ration card support link