31 हजार नागरिकांनी केला "नोटा'चा वापर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिका निवडणुकीत प्रथमच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात "नोटा'चा (नन ऑफ द अबोव्ह-अर्थात वरीलपैकी कुणीच नाही) वापर केल्याचे दिसून आले. प्रत्येक प्रभागात सरासरी आठशेवर नागरिकांनी नोटाचा वापर करीत उमेदवारांना नाकारले. याचा फटका शंभरी गाठणाऱ्या भाजपलाच बसल्याचे चित्र आहे. 

नागपूर - महापालिका निवडणुकीत प्रथमच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात "नोटा'चा (नन ऑफ द अबोव्ह-अर्थात वरीलपैकी कुणीच नाही) वापर केल्याचे दिसून आले. प्रत्येक प्रभागात सरासरी आठशेवर नागरिकांनी नोटाचा वापर करीत उमेदवारांना नाकारले. याचा फटका शंभरी गाठणाऱ्या भाजपलाच बसल्याचे चित्र आहे. 

महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मतदारांनी मतदान केला. चार सदस्यीय प्रभागामुळे एकाचवेळी चार सदस्य निवडण्याची जबाबदारी मतदारांवर होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी चारपैकी दोन किंवा तीन उमेदवारांना पसंती दिली. मात्र, एक किंवा दोन उमेदवारांना मतदारांनी "नोटा'चा वापर करीत नाकारल्याचे मतमोजणीनंतरच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. 38 प्रभागातून 31 हजारावर मतदारांनी "नोटा'चा वापर केला. मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झालेल्या उमेदवारांना "नोटा'चा फटका जाणवला नसला तरी फारच कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांनी मात्र डोक्‍यावर हात मारून घेतला आहे. 

प्रभाग 10 मध्ये भाजपचे रमेश चोपडे केवळ 68 मतांनी पराभूत झाले. या प्रभागात 487 नागरिकांनी "नोटा'चा वापर केला. यातील शंभर मतेही चोपडे यांना पडली असती, तर भाजपच्या संख्याबळात आणखी वाढ शक्‍य होती. प्रभाग 3 मध्ये भाजपच्याच नसीम बानो 402 मतांनी पराभूत झाल्या. या प्रभागात 502 मतदारांनी "नोटा'चा वापर केला. भाजपचेच बंडू पारवे कॉंग्रेसच्या परसराम मानवटकर यांच्याकडून अल्प 57 मतांनी पराभूत झाले. प्रभाग 9 मध्ये कॉंग्रेसच्या स्नेहा निकोसे यांनी नगरसेविका किरण रोडगे पाटणकर यांचा 348 मतांनी पराभव केला. या प्रभागात 639 मतदारांनी नोटाचा वापर केला. त्यामुळे बसपच्या एका नगरसेवकाचे नुकसान झाले, तर भाजपचे तीनच्या वर नगरसेवकांचे नुकसान झाले. 

2.8 टक्के नोटांचा वापर 
ंया वेळी 20 लाख 93 हजार मतदारांपैकी 11 लाख 24 हजार 631 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील 31 हजार मतदारांनी "नोटा'चा वापर केला. 53.72 टक्के मतदारांपैकी 2.8 टक्के मतदारांनी काही उमेदवारांना नाकारले. 

लोकसभेत 3,460 मतदारांनी नाकारले उमेदवार 
2014 मधील लोकसभा निवडणूक नागपूरसाठी अनेकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या निवडणुकीत 10 लाख 85 हजार मतदारांनी मतदान केले. यापैकी 3,460 मतदारांनी प्रथमच लोकसभेत "नोटा'चा वापर केला. 

Web Title: 31 thousand citizens nota use