३८ लाख मनपा तिजोरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

नागपूर - मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला पहिल्याच दिवशी तीनशे जणांनी प्रतिसाद दिला. महापौर व आयुक्तांच्या मालमत्ता जप्तीच्या इशाऱ्यामुळे दहाही झोनमधून महापालिकेच्या तिजोरीत ३८ लाख ३२ हजारांची भर पडली.

नागपूर - मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला पहिल्याच दिवशी तीनशे जणांनी प्रतिसाद दिला. महापौर व आयुक्तांच्या मालमत्ता जप्तीच्या इशाऱ्यामुळे दहाही झोनमधून महापालिकेच्या तिजोरीत ३८ लाख ३२ हजारांची भर पडली.

महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांना शेवटची संधी दिली जाणार आहे. याकरिता नव्वद टक्के दंड माफीची अभय योजना आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात २१ मार्चपर्यंत ही योजना राबविली जाणार आहे. 
पहिल्या टप्प्यातील योजनेत पहिल्याच दिवशी ३०६ जणांनी प्रतिसाद दिला. यात आशीनगर झोनमध्ये सर्वाधिक १०४ थकबाकीदारांचा समावेश असून त्यांनी ११ लाख ७ हजार रुपये तर धंतोली झोनमध्ये केवळ ५ जणांनी १३.०३ लाखांचा कर भरला. मूळ थकीत रकमेत कुठलीही सवलत न देता केवळ दंडाची रक्कम माफ करण्यात येत आहे. दंडाची ९० टक्के रक्कम माफ केल्यानंतर शिल्लक रक्कम नागरिकांनी भरली. लक्ष्मीनगर झोनमध्ये ३८ जणांनी ५.२१ लाख थकीत रकमेचा भरणा केला. 

आज पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणातील प्रतिसादामुळे अधिकाऱ्यांच्याही आत्मविश्‍वासात वाढ झाली आहे. सवलतीचा दुसरा टप्पा २४ ते ३१ मार्च या दरम्यान राबविला जाणार आहे. 

यात ७५ टक्के दंड माफ केला जाणार आहे. अनिधकृत बांधकाम केलेल्यांना दंडाची रक्कम माफ केली जाणार नाही. महापालिकेने तब्बल २३२ थकबाकीदारांचे प्रथमच हुकूमनामे प्रसिद्ध केले आहेत. दिलेल्या कालावधीत थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा थेट लिलाव करून विषय बंद केला जाणार आहे. ही प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवली जाईल. यामुळे थकबाकी भरल्याशिवाय नागरिकांना पर्याय राहणार नाही.

Web Title: 38 lakh in municipal safe