मनोरंजनातून व्यसनमुक्तीचा संदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

अमरावती - व्यसनाधीनतेमुळे शरीरासह जीवनाचा कसा नाश होतो हे कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षक रसिकांपुढे मांडले. नशाबंदी ऑर्केस्ट्रा, नशाबंदी लावणी, बतावणी, पोवाडा अन्‌ व्यसनमुक्तीच्या प्रेरणागीताच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश पोचविण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेण्यात आले. या महोत्सवाचा आज, सोमवारी समारोप झाला. या वेळी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले होते. 

दरम्यान, सकाळी नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाला सुरुवात झाली. अमली पदार्थांचे महाराष्ट्राला आव्हान विषयावर प्रारंभी चर्चासत्र घेण्यात आले. 

यानंतर शासनाच्या नशाबंदी मंडळातर्फे व्यसनमुक्ती ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. पाचव्या सत्रात संतसाहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश विषयावर परिसंवादात मान्यवरांनी आपली मते मांडली. व्यसनमुक्तीचे शपथवाचन व राष्ट्रगीताने संमेलनाचा समारोप झाला. 

प्रसारमाध्यमांची महत्त्वाची जबाबदारी 
व्यसनमुक्तीसाठी प्रसारमाध्यमांची जबाबदारी मोठी आहे. प्रसारमाध्यमातूनच व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करता येते, असा सूर वक्‍त्यांनी आपल्या भाषणातून परिसंवादात काढला. व्यसनमुक्तीसाठी साहित्यिक व प्रसारमाध्यमांची जबाबदारी व संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश विषयावर परिसंवाद झाला. या वेळी अभिनेत्री मधुरा वेलणकर, नितीन कुळकर्णी, सचिन परब, प्रा. अरविंद देशमुख, डॉ. हेमंत खडके यांसह कवी श्‍यामसुंदर सोन्नर व डॉ. दीपक पुनसे आदी उपस्थित होते.