आॅनलाईनमध्ये अकाेला जिल्हा नंबर वन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

अकोला - राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनीकीकरण प्रकल्पांतर्गत ऑनलाईन ई-फेरफार प्रणाली, मिशन दिलासा, कोतवाल बुक संगणकीकरण, लॅंड बँक, ई टेंडरींग अशा विविध सेवा आॅनलाईन पुरविणारा अकाेला जिल्हा आघाडीचा जिल्हा ठरला आहे. त्याबद्दल डिजीटल चॅम्पीयन फायनलीस्ट पुरस्काराने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानीत करण्यात आले. 

अकोला - राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनीकीकरण प्रकल्पांतर्गत ऑनलाईन ई-फेरफार प्रणाली, मिशन दिलासा, कोतवाल बुक संगणकीकरण, लॅंड बँक, ई टेंडरींग अशा विविध सेवा आॅनलाईन पुरविणारा अकाेला जिल्हा आघाडीचा जिल्हा ठरला आहे. त्याबद्दल डिजीटल चॅम्पीयन फायनलीस्ट पुरस्काराने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानीत करण्यात आले. 

मजबुत ई-प्रशासनाकरीता डिजीटल संरचना व संकल्पनांचा अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी डीजीटल एम्पावरमेंट फाउंडेशन (डीईएफ) तर्फे डिस्ट्रीक्ट कलेक्टर डिजीटल चॅम्पीयन हा पुरस्कार दिला जाताे. या श्रेणीत येण्याचा बहुमान अकाेला जिल्ह्याला मिळाला आहे. राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण प्रकल्पाअंतर्गत अकोला जिल्हयाकरीता ऑनलाईन ई-फेरफार प्रणाली प्रभावीपणे विविध नविनत्तम संरचना, संकल्पनाची अंमलबजावनी करण्याला मंथन साऊथ एशीया एशीया पॅसीफीक वर्ष २०१६-१७ च्या विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. हे दोन्हीही पुरस्कार २५ फेब्रुवारी राेजी सुरजकुंड मेला ग्राउंड, फरीदाबाद, हरीयाणा येथे डिजीटल एम्पावरमेंट फाउंडेशन (डी ई एफ) तर्फे प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण प्रकल्पांतर्गत ऑनलाईन ई-फेरफार प्रणाली ऑगष्ट २०१४ मधे तेल्हारा तालुक्यात व फेब्रुवारी २०१५ पासुन सर्व तालुक्यांमध्ये यशश्वीपणे अंमलबजावणी करणारा अकोला महाराष्ट्र राज्यात पहिला जिल्हा ठरलेला आहे. याकरीता यापुर्वीच जमाबंदी आयुक्त व निर्देशक, भुमी अभिलेख, पुणे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांचे विशेष पत्र पाठवुन अभिनंदन केलेले आहे. संपुर्ण अकोला जिल्हयात आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधीक विविध प्रकारचे ऑनलाइन फेरफार यशश्वीपणे अपलाेड करण्यात आलेत. या सर्व उपक्रमात अकोला जिल्हा आघाडीचा जिल्हा ठरला आहे. 

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची विशेष कामगिरी 
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनीकीकरण प्रकल्पांतर्गत ऑनलाईन ई-फेरफार प्रणाली, मिशन दिलासा, कोतवाल बुक संगणकीकरण, लॅंड बँक, ई टेंडरींग इत्यादी विविध प्रकारच्या ऑनलाईन व पारदर्शी सेवा प्रदान करण्याच्या संगणकीकरणाच्या उपक्रमांची अत्यंत प्रभावीपणे अमलबजावणी केली तसेच संगणकीकरणाचे विविध नवीन उपक्रम व संरचना, संकल्पनाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली व नागरीकांना तत्पर ऑनलाईन व पारदर्शी सेवा पुरविण्यात अत्यंत मोलाचे कार्य केले.

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017