अकोला: ४३ लाखांची रोख पकडली, एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

ऑटोचालकाची चौकशी
संतोष राठी हा पत्नी, लहान मुलगा व अन्य एका नातेवाईकासोबत रेल्वे स्थानकावर जात होता. त्यासाठी त्याने रणपिसेनगरातूनच ऑटो ठरविला. सुरेश नामदेव ढिसाळे (४९, रा. आंबेडकरनगर) यांच्या आॅटोतूनच राठीकडील रोकड जप्त करण्यात आली. त्यामुळे या आॅटोचालकाचीही चौकशी पोलिस करीत आहेत.

अकोला : कुटुंबासह बाहेरगावी जाण्यासाठी आॅटोने रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या व्यक्तीजवळून पोलिसांनी नवीन नोटांच्या ४३ लाखांची रोख रकम जप्त केली. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पाठलाग करून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एकास अटक केली असून, ही रकम हवालाची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.

रणपिसेनगर येथून संतोष कन्ह्यालाल राठी (४२) हा ऑटो क्र. एमएच ३० पी ९७०३ ने रेल्वे स्थानाकाकडे जात होता. त्याच्याकडे हवालाची ४३ लाखांची रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून त्याला गाठले. राठीकडून पोलिसांनी रोकड जप्त करून ऑटोही जप्त केला. आटोचालकासह राठी पोलिसांच्या ताब्यात आहे. राठीकडून जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये दोन हजार आणि ५०० च्या नवीन नोटा आहेत. रक्कम मोजण्यासाठी पोलिसांनी मशीन बोलावली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात हरिश्चंद्र दाते, शिवा बावसकर, सचिन दांदळे, गजानन बांगर, उकार्डा जाधव यांनी केली.