शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत महसूल अधिकाऱ्यांची दिवाळी

Akola
Akola

अकोला : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब व किटकनाशकाने मृत्यू झालेल्या  एकूण 40 शेतकरी बांधवांच्या घरी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी (ता. 19) दुपारी भेट देऊन दिवाळी साजरी केली. दरम्यान फराळ व कपड्यांचे वाटपासह मिशन दिलासातून अर्थसहाय्य केले. दिवाळीच्या दिवशी अशाप्रकारे शेतकरी कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा.

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात गत वर्षभरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. याशिवाय फवारणी करताना कीटकनाशकाची विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंब दुःखाच्या गर्तेत सापडले आहेत. या कुटुंबातील सदस्यांना धीर देऊन आनंदाचे क्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी  दिवाळीच्या दिवशी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. किटकनाशकाने मृत्यू झालेल्या 7 व विविध कारणांनी आत्महत्या केलेल्या 33 शेतकऱ्यांच्या घरी महसूल अधिकाऱ्यांनी भेट देऊन दिवाळी भेट व मिशन दिलासातून सानुग्रह मदतीचे वितरण केले.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासह अकोला उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांनी अकोला तालुक्यातील गोरेगाव येथील अरुण शेषराव शेगावकर यांच्या घरी भेट दिली. यावेळी मंदा शेगावकर व मुलासोबत संवाद साधत दिवाळी भेट व 10 हजार रुपये मदत दिली. यावेळी मुलांना शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, मंडळ अधिकारी दिनेश सोनोने, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. 

या कुटुंबाना मिळणार योजनांचा लाभ
आत्महत्या ग्रस्त व कीटकनाशकाने मृत्यू झालेल्या या शेतकरी कुटुंबाना संजय गांधी निराधार योजना, कुटुंब अर्थसाहाय्य योजनेसह अन्य सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com