अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा

विवेक मेतकर
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

शाळेच्या विद्यत देयकासाठी निधी द्यावा किंवा विद्युत देयके शासनाने अदा करावी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत चालवावी या व आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले.

अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वात शनिवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

निवडश्रेणी व वरीष्ठ वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा. शिक्षकांना करवी लागणारी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करुन केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटर्सची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बदली इच्छूक असलेल्या शिक्षकांना बदली मिळावी, परंतु कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयात आवश्यक दुरस्त्या व सुधारणा करुन बदल्या करण्यात याव्या, एमएससीआयटीसाठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, प्रथम पदोन्नती व विषय शिक्षक प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर बदली प्रक्रीया व्हावी.

शाळेच्या विद्यत देयकासाठी निधी द्यावा किंवा विद्युत देयके शासनाने अदा करावी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत चालवावी या व आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिले.