मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर सोयाबीन, कापूस फेकण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर सोयाबीन, कापूस फेकण्याचा प्रयत्न

अकोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गांधीग्राम येथे बळिराजा जलसंजीवनी योजनेचा उद्‌घाटन कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यावर सोयाबीन व बोंडअळी असलेली कपाशी फेकण्यापर्वीच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. दुसरीकडे याच कार्यक्रमाचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनासद्धा पोलिसांनी अटक केली.

जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करून सिंचन अनुशेष दूर करण्याकरिता बळिराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत अकोला तालुक्‍यातील गांधीग्राम येथे योजनेचा उद्‌घाटन सोहळा आज दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला. हा सोहळा नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील व राज्यातील शेतकरी कपाशी पिकावरील बोंडअळी व कीटकनाशक बळी प्रकरणामुळे हवालदिल असताना सरकार अशा प्रकारचे सोहळे आयोजित करून शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप करत गांधीग्राम येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान व मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यावर कपाशीचे पीक व सोयाबीन फेकण्यासाठी पोचलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली; तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता ललीत बहाळे यांना अकोट येथे, तर झाडाझडती आंदोलनातर्गंत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी गांधीग्राम येथे पोचलेल्या विविध संघटनांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com