अमरावती कारागृहातून कैद्याचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

अमरावती - खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अमरावती कारागृहाच्या खुल्या कारागृहातील कैदी शेख करीम शेख कालू (वय 53) हा सुरक्षारक्षकाची नजर चुकवून शनिवारी (ता. 16) पसार झाला. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली असून, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

शेख करीमला 2003 मध्ये खून प्रकरणात अटक झाली होती. त्याला न्यायालयाने 2005 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या कालावधीत तो औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला 2013 मध्ये अमरावती मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. गंभीर गुन्ह्यातील, परंतु वागणुकीत सुधारणा झालेल्या, शिक्षा अंतिम टप्प्यात आलेल्या पन्नास कैद्यांना येथीलच खुल्या कारागृहात ठेवले जाते. शनिवारी (ता. 16) येथील काही कैद्यांसोबतच करीम शेखला शेतीकामासाठी बाहेर काढले होते. त्या वेळी सुरक्षारक्षकाची नजर चुकवून त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी शेख करीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

या घटनेची माहिती अमरावती पोलिसांनी जिंतूर पोलिस अधिकाऱ्यांना दिली. शेख करीमचे जिंतूरच्या बानुबेरा परिसरात घर आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Amravati jail prisoner escape

टॅग्स