लोभी पतीने पत्नीला पाच लाखांत विकले  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

अमरावती - नवविवाहित पत्नीचा दोन वेळा गर्भपात करून पतीने अन्य दोघांच्या मदतीने तिला राजकोट येथील व्यक्तीला पाच लाख रुपयांत विकले. त्यानंतर तिचे त्याच्याशी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोर्शी पोलिसांनी मध्यस्थी महिलेसह तिघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा मोहने याने नवविवाहित पत्नीचा दोनवेळा गर्भपात केला. त्यानंतर पैशाच्या लोभापायी दोघांच्या मध्यस्थीने तिला मोर्शी तालुक्‍याच्या खानापूर येथून अमरावतीला आणले. राजकोट येथील बिरेन वल्लभभाई भीमाने याला पाच लाख रुपयांमध्ये विकून त्याच्याशी जबरदस्तीने लग्नही लावून दिले. ‘तू नकार दिल्यास आम्ही आत्महत्या करू’ अशी चिठ्ठी लिहून धमकीसुद्धा दिली. अखेर पीडित महिलेने या दुष्टचक्रातून स्वत:ची सुटका करून मोर्शी पोलिस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पती कृष्णा मोहने, राजेश पुरोहित व अलका पंचाळे (सर्व रा. खानापूर) यांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना पोलिसांनी आज न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना  गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स