आंबेडकरी नेत्यांना नाही युतीशिवाय तरणोपाय - राजेंद्र गवई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

अमरावती - रिपब्लिकन पक्ष व नेत्यांचा आजवरचा इतिहास पाहिला असता एकही नेता कुणाच्या मदतीशिवाय निवडून आलेला नाही. हीच स्थिती आजही आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे किंवा मला कुण्या पक्षाशी युती केल्याशिवाय तरणोपाय  नाही, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

डॉ. गवई म्हणाले की, रिपब्लिकन ऐक्‍याची भाषा पुन्हा बोलली जाऊ लागली. माझेही ऐक्‍याला समर्थन राहील; मात्र एकेकाळी दादासाहेब गवई तसेच शरद पवार यांच्या पुढाकारातून झालेले ऐक्‍य पुन्हा होण्याची शक्‍यता कमीच आहे. तसे असले तरी ऐक्‍याची प्रक्रिया प्रामाणिकपणे सुरू झाल्यास आपल्यापेक्षा ज्येष्ठ ॲड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले तसेच प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यानंतरचा क्रमांक मिळाला तरी हरकत राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर आरपीआय कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा  आरोप केला जात आहे. असे गुन्हे त्वरित मागे घेतले जावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत. आपण आजही यूपीएसोबत असून पुढील राजकीय वाटचालसुद्धा सोबतच राहणार आहे. कोरेगाव भीमा घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या ‘बंद’ला आपण पाठिंबा दिला होता. त्यामुळे या ‘बंद’चे यश आंबेडकरी जनतेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

पत्रकार परिषदेला प्रा. भाऊ ढंगारे, जिल्हाध्यक्ष हिंमत ढोले, वसंत गवई, ॲड. दीपक सरदार, ॲड. उमेश इंगळे आदी उपस्थित होते. 

 लोकसभा लढविणारच 
आपण आजही काँग्रेसप्रणीत यूपीएचेच घटक आहोत. आगामी लोकसभा निवडणूक अमरावती मतदारसंघातून लढविणार असून; काँग्रेसचा उमेदवार असला तरी त्याविरोधात लढण्यास आपण तयार असल्याचे डॉ. गवई यांनी स्पष्ट केले.

Web Title: amravati news rajendra gawai RPI