शेततळे याेजना: अमरावती विभाग लक्ष्यांकापासून दूर 

सुगत खाडे
रविवार, 3 जून 2018

अकाेला - शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ याेजना सुरू केली आहे. परंतु शेततळ्यांसाठी मिळणाऱ्या ताेडक्या अनुदानामुळे याेजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अमरावती विभागासह राज्यातील इतर विभाग शेततळ्यांसाठी मिळालेल्या लक्षांकापासून दूरच आहेत. 

राज्यातील पर्जन्यावर आधारित काेरडवाहू शेतीसाठी पाणलाेट व जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ याेजना सुरू केली आहे. याेजनेतंर्गत राज्यातील विभागांना शेततळे पूर्ण करण्याचे लक्षांक देण्यात आले आहे. परंतु 2016-17 पासून देण्यात आलेले लक्षांक अद्याप अपूर्ण आहे. राज्यातील कृषी विभागाला याेजना सुरू झाल्यापासून एक लाख 12 हजार 311 शेततळे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. परंतु 2016 पासून 29 मे 2018 केवळ 85 हजार 164 शेततळ्यांचीच कामे पूर्ण झाली आहेत. तर अद्याप 27 हजार 147 कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी ही याेजना अद्याप शेतकऱ्यांपासून लांबच असल्याचे दिसून येत आहे.
 
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Amravati section is far from the targets in shettale scheme