वृत्तपत्र विक्रेत्यांनाही पुरस्कार मिळावा - खडसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

गोंदिया - समाजातील चांगल्या-वाईट घडामोडी पत्रकार वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आणतो. वृत्तपत्राला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता करीत असतो. म्हणून पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता विक्रेता घराघरांत वृत्तपत्र पोहोचवितो. त्यामुळे या घटकालाही माहिती व संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनेत समाविष्ट करावे, असे मत जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी व्यक्त केले.

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज, शुक्रवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विश्रामगृहात पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख होते. प्रमुख पाहुणे संघाचे मार्गदर्शक प्रा. एच. एच. पारधी, सचिव संजय राऊत, वरिष्ठ सदस्य विकास बोरकर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भोयर, सचिव हर्षदीप उके उपस्थित होते.

श्री. खडसे यांनी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून माहिती व संचालनालय विभागाच्या वतीने क्रियान्वित योजनांची माहिती दिली.

प्रा. पारधी यांनीही मत व्यक्त करीत पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून यंदा वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेते हर्षदीप उके, हेमंत हलमारे, दुर्गाप्रसाद अग्रहरी, हरजित वाढई, वीरेंद्र अग्रवाल, संतोष खानोरकर, राजेंद्र राजकुमार, महेश तरोणे, रमेश भोयर,ो राजेश वैद्य, कृष्णा शर्मा, कस्तुरचंद सोनवाने, वीरेंद्रसिंग ठाकूर, शिवप्रसाद कोठेवार यांचा पुष्पगुच्छ व बॅग देऊन सत्कार करण्यात आला. संचालन सावन डोये यांनी केले. 

आभार महेंद्र बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी खेमेंद्र कटरे, नवीन अग्रवाल, आनंद मेश्राम, रवी सपाटे, उदय चक्रधर, मुनेश्‍वर कुकडे, हरीश मोटघरे, बाबा शेख, देवेंद्र बिसेन, महेंद्र माने यांनी सहकार्य केले.

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017