गोवंश मांसाची वाहतूक करणारे वाहन जप्तं

अनिल दंदी
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

बाळापूर,  (अकोला) - शेकडो किलो मांसाची अवैद्य वाहतूक करताना दोघांना उरळ पोलीसांनी ताब्यात घेतले असून वाहनासह गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे.

गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असला तरी मांसाची विक्री वा वाहतूक र सहजपणे होत असल्याचा प्रकार पुढे येत आहे.

आज सकाळी उरळ पोलीसांनी लोहारा येथे पकडलेल्या मुद्देमालाची किंमत 2 लाख विस हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही गोमांसाची वाहतूक आणि विक्री केली जात आहे. हातरुण येथील कसाया कडून गोवंशाची कत्तल केली जात असून आजु-बाजुच्या परीसरात त्याची विक्री होते. उरळ पोलीसांनी यापुर्वी हातरुण येथील कसायांवर कारवाई केली आहे. तर स्थानीक गुन्हे शाखेने देखील कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली जनावरे ताब्यात घेतली होती.

आज लोहारा येथील नागरीकांनी या बाबत उरळ पोलिसांना माहिती देताच पोलीसांनी तातडीने लोहारा येथे धाव घेऊन ओमनी इको  एम एच 30 ए ए 1869 या वाहनिची तपासणी केली.

त्या वेळी त्यात शंभर किलो गोवंश मांस  असल्याचे निदर्शनास आले. वाहनातील  मो.हानिफ, शे.साबीर (रा.हातरुण) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यावर वाहन व गोवंश मांस उरळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईत दोन लाख विस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हि कारवाई उरळ ठाणेदार सोमनाथ पवार, पोलीस कर्मचारी संजय वानखडे, जयेश शिंगारे,  यांनी केली.