आधार लिंक करण्यासाठी विद्यार्थी रात्रभर रांगेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

लाखांदूर (जि. भंडारा) - तालुक्‍यातील अनेक शालेय विद्यार्थ्यांना सध्या आधारकार्ड बॅंकखात्याला लिंक करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तालुक्‍यात येथील एकमेव केंद्र सुरू असल्याने रात्रभर विद्यार्थ्यांची रांग दिसून येते. यात १० ते १२ तासांनंतर आधार लिंक होत असल्याने शाळकरी मुलामुलींनी आधार केंद्र वाढविण्याची मागणी केली आहे.

सध्या शाळकरी मुलांना शिष्यवृत्तीसाठी आधारकार्ड बॅंकखाते व मोबाईल नंबरला लिंक केल्याशिवाय अर्ज भरता येत नाही. तालुक्‍यात अशी चार केंद्रे होती. सध्या त्यापैकी एकच केंद्र सुरू आहे. त्यामुळे तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. 

दिवसभर नेटवर्कची समस्या असते. त्यामुळे येथील आधार केंद्रात ग्रामीण भागातील विद्यार्थी रात्री १२ वाजेपर्यंत येतात. ते केंद्रासमोर रांग लावून उभे राहातात. मात्र त्यांचा नंबर सकाळी आठ वाजता लागतो. तरीही आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना रात्री जागरण करून आधार लिंक करावा लागत आहे. या रांगेत इयत्ता सातवी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी आधार लिंक करण्यासाठी १२ तास रांगेत राहतात.

लाखांदूर तालुक्‍यातील बीएसएनएलच्या ब्रॉडबॅंडच्या नेटवर्कचे काम सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत चांगले चालते. त्यानंतर मात्र, स्पीड मंद होतो. त्यामुळे शाळकरी मुलांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना आधार लिंकसाठी शाळेतच पर्याय व्यवस्था करून देण्यात यावी आणि तालुक्‍यात आधार केंद्र वाढविण्यात यावे, अशी मागणी तालुक्‍यातीळ जनतेने केली आहे.