अकोल्यात भाजपचे अग्रवाल महापौर 

अकोल्यात भाजपचे अग्रवाल महापौर 

अकोला : महापालिका निवडणुकीत भरघोस यश मिळविणाऱ्या भाजपचे विजय अग्रवाल यांनी अकोल्याचे सातवे महापौर होण्याचा मान मिळविला. गुरुवारी (ता. ९) झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपच्याच वैशाली शेळके निवडून आल्या. 

महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी गुरुवारी मनपा सभागृहात सभा झाली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पीठासीन अधिकारी असलेल्या या सभेत हातवर करून निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार कायम ठेवले. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणूक घेण्यात आली.

महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे विजय अग्रवाल यांनी काँग्रेसचे शेख मो. नौशाद श. युसुफ यांचा ४९ विरुद्ध १७ मतांनी पराभव केला. 
भाजपची ४८, तर अपक्षाचे एक अशी 49 मते अग्रवाल यांना मिळाली. काँग्रेसचे १३, भारिप-बमसंचे ३ आणि एक काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवाराचे मत शेख मो. नौशाद यांनी मिळाले. शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आणि एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिले. 

उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीतही भाजपच्या वैशाली शेळके यांनी काँग्रेसच्या सुर्वणरेखा जाधव यांचा ४९ विरुद्ध १७ मतांनी पराभव केला. त्यानंतर खासदार संजय धोत्रे, आमदार गाेवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर आणि मान्यवराच्या उपस्थितीत अग्रवाल आणि शेळके यांनी पदग्रहण केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com