कुपनलिकांनी होतेय अकोल्याची चाळणी!

अनुप ताले
शनिवार, 26 मे 2018

अकोला : उन्हाळ्यात पाणी लागले, तर वर्षभर भरपूर पाणी मिळते, असा समज असल्याने शहरात, ग्रामीण भागात व प्रामुख्याने शेतात कुपनलिका खोदण्याचा सपाटा लोकांनी लावला आहे. त्यासाठी कोणाचीही परवानगी घेतली जात नसून त्याबाबत प्रशासनाकडून कोणती कारवाईसुद्धा करण्यात येत नाही. 

गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जिल्ह्यात लोकसंख्या वाढीसोबतच पाण्याचा वापर वाढला. त्यासाठी तलाव, धरणे, नदी, विहिरी, कूपनलिका, हातपंप या जलस्त्रोतांचा उपयोग केला जातो. मात्र, गतमोसमात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, त्यामुळे या जलस्त्रोतांमध्ये जलसाठ्याची पर्याप्त मात्र उपलब्ध होऊ शकली नाही.

भू-जल पातळीसुद्धा घसरली. विहिरी कोरड्या पडल्या. कुपनलीका आटल्या. मात्र, अशा स्थितीतही युद्धपातळीवर भू-गर्भात २०० ते ५०० फुटापर्यंत खोल खोदकाम करून पाणी शोधण्याचा प्रयत्न लोक करीत आहेत. निसर्गावर त्याचा दुष्परिणाम काय होईल याबाबत मात्र कोणीही विचार करायला तयार नाही. 

पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी हजारोंचा खर्च 
जमिनीच्या कोणत्या भागात भरपूर पाणीसाठा असू शकतो, हे अंदाज बांधून सांगणारे काही लोक ग्रामीण भागात व्यवसाय थाटून बसले आहेत. तांब्याच्या तारा, नारळ, भांडी, बेडूक इत्यादीचा उपयोग करून हे लोक अंदाज बांधत असतात. मात्र, त्यासाठी ते पाचशे पासून ते पाच हजार रुपयांपर्यंत पैसे आकारतात. 

नोंदणीचा अभाव 
किती अंतरावर कुपनलीका असावी, किती खोलापर्यंत खोदावी, त्यासाठी प्रशासनाची अधिकृत परवानगी घेणे आदी नियम शासनाने बनविलेले आहेत. मात्र, कोणाला काय कळते व शासन कोणतीही कारवाई करत नाही, असे म्हणून सर्व नियम धाब्यावर बसवून लोक कुपनलीका खोदत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लाखो कुपनलीकांचे मोठे जाळेच तयार झाले असून, मोठ्या प्रमाणात अवैधपणे पाण्याचा उपसा सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडे याची कोणतीच नोंदणी नसल्याची बाब समोर आली आहे. 

निसर्गप्रेमी संस्था निद्रीस्त 
निसर्गाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्याचे व निसर्ग संवर्धनासाठी जनजागृतीचे कार्य करण्यासाठी काही निसर्गप्रेमी संस्था पुढाकार घेतात. मात्र कुपनलीकांद्वारे भू-गर्भाची चाळणी होत असताना, या संस्थांकडून कोणताही विरोध दर्शविला जात नसून, प्रशासनही डोळे बंद करून बसल्याची स्थिती आहे.

Web Title: borewell pumps affecting water supply in Akola