बुलडाण्यातील 39 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

आयोगाच्या आदर्श आचारसंहिता त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहीता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत 39 ग्रामपंचायतींच्या 72 रिक्त पदांकरीता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये 23 एप्रिल 2018 च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

आयोगाच्या आदर्श आचारसंहिता त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहीता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

निवडणुकीची अधिसूचना 27 एप्रिल 2018 रोजी संबधित तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र 7 मे ते 12 मे 2018 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4.30 वाजेदरम्यान  स्वीकारले जाणार आहे. या निवडणुकीचे मतदान 27 मे  2018 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 28 मे 2018 रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

Web Title: Buldana 39 Local Body Election bypoll election Declared