कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात काँग्रेसचा शेगावात घंटानाद

संजय सोनोने
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे त्वरीत बिनव्याजी दहा हजाराचे वाटप करावे व सोयाबिनचे दोनशे रूपये प्रतिक्विंटल अनुदान वितरीत करावे.

शेगाव : अर्ज प्रक्रिया जाचक अटींमुळे त्रासदायक ठरत असल्याने तातडीने बंद करा, बिनव्याजी कर्ज दहा हजाराचे त्वरीत वितरण करा, सोयाबीनचे दोनशे रूपये अनुदानही वितरीत करा आदी मागण्यांसाठी तालूका व शहर काँग्रेसच्या वतीने आज स्थानिक तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तद्नंतर महामहिम राज्यपालांना तहसिलदारांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात भाजपा सरकारने कर्जमाफीची

घोषणा केली असून अमंलबजावणी करण्यासाठी मात्र त्रासदायक पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून बहूतांश शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता आहे. सध्या सणासुदीचे व शेतातील कामगिरीचे दिवस सोडून शेतकरी पत्नीसह दोन दोन दिवस ऑनलाईन सेंटरवर चकरा मारत आहेत त्यामुळे शेतकरी वर्गाला प्रचंड आर्थीक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन पध्दत बंद करून सरकारी कर्मचार्‍यांमार्फत कर्जमाफीचे अर्ज भरून घ्यावे.

शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे त्वरीत बिनव्याजी दहा हजाराचे वाटप करावे व सोयाबिनचे दोनशे रूपये प्रतिक्विंटल अनुदान वितरीत करावे आदी मागण्या नमुद असून निवेदनावर मा. नगराध्यक्ष शिवाजीराव बुरूंगले, काँग्रेस तालूकाध्यक्ष अशोकराव हिंगणे, शहराध्यक्ष केशवराव हिंगणे, किरणबाप्पू देशमुख, शहर महिला अध्यक्षा सुनिताताई कलोरे, संगिताताई पहूरकर, दयारामभाऊ वानखडे, विठ्ठल सोनटक्के, संजय माठे, विजय वानखडे, शे.अमिन, आसिफखान, शिवाजी माळी, विजय काटोले, शे.सलमान, तौसिफराजा, बाबुलाल कराळे, पवन पचेरवाल, अनिल सावळे, चंद्रकांत माने, काशिराम कात्रे, गणेश पाटील, मोतीराम खवले, सुबोध गिर्‍हे, रामदास भोंडे, फिरोजखान, राजेश पारखेडे, लक्ष्मण डिगोळे, सुरेश गवई, सुधाकर हिंगणे आदींसह शेकडो सहया आहेत.