उमेदवाराला द्यावा लागेल पॅन क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नागपूर - केंद्र सरकारकडून मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन क्रमांक आवश्‍यक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असताना राज्य निवडणूक आयोगाने हे सक्तीचे केले आहे. उमेदवारास अर्ज भरताना पॅन क्रमांक जोडावा लागणार आहे. यामुळे ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही, अशांची विशेष करून इच्छुक महिला उमेदवारांची गोची होण्याची शक्‍यता आहे. 

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज अनिवार्य करण्यात आले. यामुळे योग्यरीत्या भरला जातो व अर्ज अवैध ठरत नाही, असा दावा निवडणूक प्रशासनाचा आहे. अर्ज भरताना उमेदवारास शिक्षण, व्यवसाय अपत्यांची, न्यायालयीन प्रलंबित प्रकरण, ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले, असे प्रकरण व मालमत्तेची माहिती द्यावी लागते. सार्वजनिक वित्तीय संस्था, शासकीय, निमशासकीय संस्थांची थकीत रकमेचीही माहिती द्यावी लागणार आहे. 

तर अपत्यांचा वेगळा अर्ज भरून द्यायचा आहे. याचसोबत पॅन क्रमांक आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचीही माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही, त्यांची अडचण होण्याची शक्‍यता आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सर्व व्यवहार पारदर्शी होणार असल्याने अनेक उमेदवारांची भविष्यात अडचण होणार असल्याचे सांगण्यात येते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशवरून यंदापासून प्रत्येक उमेदवाराचे शपथपत्र मतदान केंद्रस्थानी लावण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्व माहिती मतदारास मिळणार आहे.

विदर्भ

नांदुरा (बुलडाणा) : गेल्या अनेक दिवसांपासून नांदुरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील मका, कपाशी, सोयाबीन, ज्वारी...

03.33 PM

अकाेला : बुलडाणा येथून बाळापूरला कामासाठी जाणाऱ्या मजूरांच्या रिक्षाला (अॅपे) ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे...

01.42 PM

अकोला : नॅशनल इंट्रिग्रिटी मिशन व वंदेमातरम संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अकोलेकरांसाठी ‘तिरंगी एअर शो’चे आयोजन...

10.33 AM