व्यंग्यचित्र हा व्यवसाय होऊ शकत नाही - प्रा. मनोहर सप्रे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नागपूर - मानवी जीवनातील इरसाल नमुने, जीवनातील वास्तव चित्र आणि दैनंदिन घटनांचे प्रतिबिंब म्हणजे व्यंग्यचित्रे आहेत. ती वृत्तपत्रात एक्‍स-रे रूपात प्रकाशित होत असतात. तंत्रज्ञानाने ‘स्पीड’ नावाची वस्तू आपल्या हाती दिली. डिजिटल युगाने मानवी जीवनातील मानसिकता विष्कळीत केली, अशा वातावरणात करिअर म्हणून व्यंग्यचित्रकारांना वाव नाही. व्यंग्यचित्र हा व्यवसाय होऊ शकत नाही, अशी भावना प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार प्रा. मनोहर सप्रे यांनी व्यक्त केली.  

नागपूर - मानवी जीवनातील इरसाल नमुने, जीवनातील वास्तव चित्र आणि दैनंदिन घटनांचे प्रतिबिंब म्हणजे व्यंग्यचित्रे आहेत. ती वृत्तपत्रात एक्‍स-रे रूपात प्रकाशित होत असतात. तंत्रज्ञानाने ‘स्पीड’ नावाची वस्तू आपल्या हाती दिली. डिजिटल युगाने मानवी जीवनातील मानसिकता विष्कळीत केली, अशा वातावरणात करिअर म्हणून व्यंग्यचित्रकारांना वाव नाही. व्यंग्यचित्र हा व्यवसाय होऊ शकत नाही, अशी भावना प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार प्रा. मनोहर सप्रे यांनी व्यक्त केली.  

कार्टूनिस्ट्‌स कम्बाईन आणि कार्टूनिस्ट झोन या संस्थांतर्फे प्रा. सप्रे यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. कोणत्याही पुरस्काराबद्दल आपल्याला आकर्षण नसल्याचे सांगत, व्यंग्यचित्र काय, कविता काय किंवा वात्रटिका काय, त्यांतले शब्द किंवा रेषा म्हणजे पापुद्रे असतात. त्यांचा खरा अर्थ आणि कलाकाराचे व्यक्तिमत्त्व त्यामागेच दडलेले असते. वाचकाला तिथपर्यंत पोहोचायचे म्हणजे सावकाशपणे एकेक पापुद्रा सुटासुटा करत जावे लागते. मात्र, कार्टून व्यवसाय होऊ शकत नाही, तर तो हाती पाच रुपयांची पेन्सिल घेऊन छंद जोपासता येतो. प्रा. सप्रे यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या व्यंग्यचित्रांतून नानाविध अशा मोठ्या घटनांवर मार्मिक भाष्य केले आहे. हे बहुआयामी असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची चिकित्सक आणि तटस्थ वृत्ती व्यंग्यचित्रांतून तसेच त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर दिसून येते. अलीकडेच नोटाबंदीच्या विषयावर व्यंग्यचित्रे काढली आहेत. परंतु, मराठी वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली नाही. अलीकडे कॅशलेश व्यवहार करण्यातून साऱ्यांना असुरक्षितता वाटत असली, तरी २०० कोटी खर्च करून राजकारण्यांच्या घरी लग्न होतात. मात्र, अडीच लाख मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचा विरोधाभासही त्यांनी व्यक्त केला.

सध्याच्या सामाजिक वातावरणावरही सप्रे यांनी परखड मत व्यक्त केले. मानवी समस्या सोडवू शकत नाही; मात्र हिंदूंची संख्या वाढवा, असे आवाहन साधुसंतांकडून होत आहे. आपल्या देशात चित्र वेगळेच दिसते. सरदार पटेल यांचा पुतळा चीन देशात तयार होत आहे. आम्ही सर्वच वस्तू रेडिमेड घेतो. चायनाकडून सर्व खरेदी करीत आहोत. बुलेट ट्रेनचे स्वप्न आपल्याला देत असताना १८ लाख पदवीधर बेरोजगार आहेत, याकडे सरकारचे लक्ष नसल्याची चिंताही सप्रेंनी व्यक्त केली.

...तर मी व्यंग्यचित्रकार झालो नसतो  
 व्यंग्यचित्र काढणे ही कला आहे. ती उपजत असावी लागते. उपजत कलेचे संवर्धन करण्यासाठी नेमके निरीक्षण टिपणे महत्त्वाचे असते. व्यंग्यचित्राला लय असते. ही लय शोधण्यासाठी पहिली भूमिका रसिकाची असल्याचे सांगत मी माझ्या कलेचा पहिला रसिक आहे, असे सांगताना उदय वाडेगावकर भेटले नसते तर मी व्यंग्यचित्रकार होऊ शकलो नसतो, असे प्रा. सप्रे म्हणाले.

विदर्भ

नांदुरा (बुलडाणा) : गेल्या अनेक दिवसांपासून नांदुरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील मका, कपाशी, सोयाबीन, ज्वारी...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

अकाेला : बुलडाणा येथून बाळापूरला कामासाठी जाणाऱ्या मजूरांच्या रिक्षाला (अॅपे) ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

अकोला : नॅशनल इंट्रिग्रिटी मिशन व वंदेमातरम संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अकोलेकरांसाठी ‘तिरंगी एअर शो’चे आयोजन...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017