सीबीएसई बारावीत मुलीच हुशार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) शनिवारी (ता. २६ ) घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात मुलींच हुशार ठरल्या. वाणिज्य शाखेत ९८.६ टक्‍क्‍यासह भारतीय विद्या भवनच्या सिव्हील लाईन्स शाखेतील निधी चांडक हिने शहरात प्रथम स्थान पटकाविले. विज्ञान शाखेत सेंटर पाईंटच्या सेमिनरी हिल्स शाखेतील अमिषा केळकर हिने ९७.८ टक्‍के तर ह्युमॅनिटीज शाखेत भवन्स श्रीकृष्ण नगरचा नैतीक मुळे आणि वायुसेनानगर केंद्रीय विद्यालयातील खुशबू शर्मा यांनी ९५.८ टक्‍क्‍यासह संयुक्तरित्या प्रथम क्रमांक मिळविला.

गेल्या अनेक दिवसांपासून सीबीएसई बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांना उत्सूकता होती. निकालात शहरातील सीबीएसई शाळांनी बरीच मोठी कामगिरी केली. वाणिज्य शाखेत भवन्सच्या श्रीकृष्णनगर शाखेतील केशव मोदी याने ९७.६ टक्के गुण घेत दुसरे तर भविन पटेलने ९७.२ टक्‍क्‍यासह तिसरे स्थान मिळविले. विज्ञान शाखेत भवन्सच्या सिव्हील लाईन्स शाखेच्या सेंटर पॉईंट स्कूल सेमिनरी हिल्स येथील तनया रमानी हिने ९६.८ टक्‍क्‍यासह दुसरे तर अमित मोहरील आणि तन्मय बुंदीवाला यांनी ९६.२ टक्‍क्‍यासह संयुक्तरित्या तिसरे स्थान पटकाविले. मानव्यशास्त्र शाखेत केंद्रीय विद्यालयाच्या गौरी मेश्राम हिने दुसरे तर तिसरे भवन्स श्रीकृष्णनगर शाखेच्या वेदांत देशपांडेने ९५ टक्‍क्‍यासह तिसरे स्थान पटकाविले. सेंटर पॉईंटसह, भारतीय विद्या भवनच्या दोन्ही शाखांनी निकालात चांगली कामगिरी केली. दूपारच्या उन्हातही निकालासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

बारावी निकाल सीबीएसई
विज्ञान शाखा 

अमिषा केळकर - ९७.८ % सेंटर पॉईंट, काटोल रोड
तनया रमानी - ९६.८ % सेंटर पॉईंट, काटोल रोड
अमित मोहरे  - ९६.२ % भवन्स, सिव्हील लाईन्स

वाणिज्य शाखा
निधी चांडक - ९८.६ % भवन्स, सिव्हील लाईन्स
केशव मोदी - ९७.६ % भवन्स, श्रीकृष्णनगर
भविन पटेल - ९७.२ भवन्स, श्रीकृष्णनगर

मानव्यशास्त्र विभाग
नैतीक मुळे - ९५.८ % भवन्स, श्रीकृष्णनगर
खुशबू शर्मा ९५.८ केंद्रीय विद्यालय 
गौरी मेश्राम - ९५.२ केंद्रीय विद्यालय 
वेदांत देशपांडे - ९५ भवन्स श्रीकृष्णनगर

Web Title: CBSE Result Girls Clever